सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात बुधवार दिनांक २८ जानेवारी २०२६ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक जागृती, स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन तसेच डिजिटल युगातील सुरक्षिततेबाबत जनजागृती घडवून आणण्याच्या उद्देशाने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
व्याख्यानमालेतील पहिल्या सत्रात प्रा.डॉ.नवनाथ शिंदे यांनी “युवक वाचतील तर देश वाचेल” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी आजच्या युवकांची बदलती मानसिकता, दैवशरणता, प्रवाहपतितता, स्थितीवादी वृत्ती, भावनिक लाटांवर वाहून जाण्याची प्रवृत्ती तसेच समूहशरणता यांसारख्या बाबींचा सखोल ऊहापोह केला.“पैशाची श्रीमंतीपेक्षा वैचारिक श्रीमंती श्रेष्ठ असते,” असे सांगत त्यांनी युवकांनी ललितेतर वैचारिक आणि प्रबोधनपर साहित्य वाचण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले.
दुसऱ्या सत्रात प्रा. विजय सोनवणे यांनी “स्पर्धा परीक्षा तयारी” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, अभ्यासाची प्रभावी रणनीती, वेळेचे योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यांनी स्वतःच्या अनुभवांवर आधारित उदाहरणे देत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. नियोजनबद्ध अभ्यास, सकारात्मक दृष्टिकोन आणि सातत्य यांमुळे यश निश्चित मिळते, असा संदेश त्यांनी दिला.
तिसऱ्या सत्रात प्रा.सीमा जोशी यांनी “सायबर गुन्हे व सुरक्षा” या विषयावर मार्गदर्शन करताना डिजिटल युगातील वाढते सायबर धोके आणि त्यापासून बचावाचे उपाय यांची माहिती दिली.प्रा.जोशी यांनी विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण झाली.
या व्याख्यानमालेचे आयोजन
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.ए.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी
डॉ.शांताराम चौधरी, बहि:शाल शिक्षण मंडळाचे केंद्रकार्यवाह प्रा.साईप्रसाद कुंभकर्ण,
प्रा.राकेश माळी,डॉ.संगीता वाकोळे,
डॉ.राजेंद्र पवार, प्रा.लतिका पंडुरे, तसेच इतर प्राध्यापक व
प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Post a Comment