कोल्हार प्रतिनिधी:
एक्स्पर्ट इंटिग्रेटेड क्लासेस कोल्हार यांनी २०२६ च्या शैक्षणिक वर्षासाठी आपल्या प्रवेशाची घोषणा केली आहे. विशेषतः इंजिनिअरिंग (MHT-CET) आणि मेडिकल (NEET) क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १ मार्च २०२६ पासून विशेष क्रॅश कोर्स सुरू होत आहेत.
या क्रॅश कोर्सचे मुख्य आकर्षण म्हणजे '७० दिवस-७० टेस्ट' ही संकल्पना असून, विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी रोज ५ तास लेक्चर्स आणि ३ तास टेस्ट घेतल्या जाणार आहेत. संस्थेने प्रत्येक बॅचसाठी मर्यादित जागा (४० ते ५०) ठेवल्या असून वैयक्तिक लक्ष देण्यावर भर दिला आहे.
संस्थेने गेल्या 10 वर्षापासून ते आत्तापर्यंत अनेक इंजिनिअर आणि डॉक्टर घडवले आहेत
संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मोठी बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. MHT-CET मध्ये ९९.५० पेक्षा जास्त पर्सेंटाईल मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला ५१,००० रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षेत १०० पैकी १०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २१,००० रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन कोल्हार येथे भव्य होस्टेल आणि मेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गुगल प्ले स्टोअरवर 'Expert Classes' चे ॲपही उपलब्ध अशी माहिती योगेश होन सर व ईश्वर होन सर यांनी दिली आहे.
Post a Comment