कोल्हार वार्ताहर : गणेश कुंभकर्ण
तर तो या समाजातील प्रत्येक घटकासाठी समर्पित भावनेने काम करणे त्यांना मुख्य प्रवाहात आणणे वेगवेगळ्या योजनेतून त्यांना जोडणे यातूनच भारत जोडला जातो,
असे प्रतिपादन महसूल मंत्री नामदार विखे पाटील यांनी केले.
महायुतीचे उमेदवार, खासदार सदाशिव लोखंडे यांचे प्रचारार्थ बूथ सक्षमीकरण अभियान व कार्यकर्ते संवाद बैठक कोल्हार भगवतीपुर येथे संपन्न झाली त्याप्रसंगी ते बोलत होते.
नामदार विखे पाटील पुढे म्हणाले की
दहा वर्षापासून विश्व नेते नरेंद्र मोदी देशाचे नेतृत्व करीत आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा फडकतो आहे भारत महासत्ता होणार हे फक्त सांगितले जात होते पण आज विश्वनेते मोदी यांच्या नेतृत्वामुळे भारताला महासत्ता म्हणून जग पाहिला लागले आहे समर्थ व सामर्थ्यवान नेतृत्व विश्वनेते मोदी हेच आहे हे आता देशाने ओळखले आहे. त्यामुळेच देशात एकच नारा आहे की आपकी बार 400 पार यात आपल्या शिर्डी व अहिल्यानगर जागेचा समावेश असला पाहिजे असे आवाहन करून भ्रष्टाचार घडवण्यासाठी विरोधकाची सत्तावीस 27 पक्षाची आघाडी आहे त्यांचे नेतृत्व त्यांचे कोण करणार? हे अजून ठरायचे आहे त्यामुळे विरोधक म्हणतात आम्ही लोकशाही पद्धतीने एकत्र बसू मारामाऱ्या करू आणि मग आमचे नेतृत्व ठरवू अशी विरोधकांची अवस्था असल्याचे नामदार विखे यांनी विरोधकांची खिल्ली उडवली.
याप्रसंगी प्रवरा बँकेचे चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे पाटील, कोल्हार भगवतीपुर देवालय ट्रस्टचे साहेबराव दळे पा, कमलबाई गुगळे, भगवतीपुर ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रकाश खर्डे पा., बाबासाहेब दळे पा,चंद्रभान खर्डे पा, सुनील शिंदे आदी सह कोल्हार भगवतीपुर येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नामदार विखे यांची स्टार प्रचारक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप राजभोज यांनी केले.
Post a Comment