शिर्डी – 

 श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने नाताळ सुट्टी, सरत्‍या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाच्‍या दिनांक २५ डिसेंबर २०२५ ते दिनांक ०२ जानेवारी २०२६ याकालावधीत सुमारे ०८ लाखाहुन अधिक साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले तर या कालावधीत सुमारे २३.२९ कोटी रुपये देणगी प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी दिली. श्री. गाडीलकर म्‍हणाले, नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त दिनांक २५ डिसेंबर २०२५ ते दिनांक ०२ जानेवारी २०२६ याकाळात दानपेटीतून ६ कोटी ०२ लाख ६१ हजार ००६ रुपये, देणगी काउंटर व्‍दारे ३ कोटी २२ लाख ४३ हजार ३८८ रुपये, पी.आर.ओ. सशुल्‍क पासद्वारे २ कोटी ४२ लाख ६० हजार रूपये, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक/डिडी व मनी ऑर्डद्वारे १० कोटी १८ लाख ८६ हजार ९५५ रुपये तर, विविध २६ देशांचे परकिय चलनाद्वारे १६ लाख ८३ हजार ६७३ रुपये अशी एकुण २२ कोटी ०३ लाख ३५ हजार ०२२ रुपये देणगी रोख स्‍वरुपात प्राप्‍त झालेली आहे. तसेच सोने (२९३.९१० ग्रॅम) ३६ लाख ३८ हजार ६१० रुपये व चांदी (०५ किलो ९८३ ग्रॅम), ९ लाख ४९ हजार ७४१ रुपये देणगी प्राप्‍त झालेली आहे. तसेच नविन वर्षाचे पहिल्‍या दिवशी श्री साईबाबांच्या चरणी ६५५ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षिकाम असलेला सुवर्ण-हिरे जडीत मुकुट अर्पण केला. सदर मुकुटाची अंदाजे किंमत सुमारे ८० लाख रुपये असून त्यामध्ये अंदाजे ५८५ ग्रॅम शुद्ध सोने व सुमारे १५३ कॅरेटचे मौल्यवान हिरे आहेत. अशा प्रकारे विविध माध्‍यमातुन अंदाजे एकुण २३ कोटी २९ लाख २३ हजार ३७३ रुपये देणगी संस्‍थानला प्राप्‍त झालेली आहे. तसेच याकालावधीत श्री साईप्रसादालयात ०६ लाखाहुन अधिक साईभक्‍तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर सुमारे १ लाख ०९ हजाराहुन अधिक साईभक्‍तांनी अन्‍नपाकीटांचा लाभ घेतला आहे. याबरोबरच ७ लाख ६७ हजार ४४४ लाडु प्रसाद पाकीटांची विक्री करण्‍यात आली असून याव्‍दारे ०२ कोटी ३० लाख २३ हजार ३२० रुपये प्राप्‍त झालेले आहे. याबरोबरच ५ लाख ७६ हजार ४०० साईभक्‍तांनी मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ घेतला. श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने प्राप्‍त झालेल्‍या दानाचा विनियोग हा श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्‍णालय, श्री साईप्रसादालय मोफत भोजन, संस्‍थानच्‍या विविध शैक्षणिक संस्‍था, बाह्य रुग्‍णांना चॅरिटीकरीता, साईभक्‍तांच्‍या सुविधाकरीता उभारण्‍यात येणारे विविध उपक्रम व विविध सामाजिक कामाकरीता करण्‍यात येत असल्‍याचे ही श्री. गाडीलकर यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post