कोल्हार प्रतिनिधी : प्रा.साईप्रसाद कुंभकर्ण
कोल्हार येथे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास कोल्हार मध्ये काही महिलांनी पुढाकार घेऊन अवैध व्यवसाय करणाऱ्या टपऱ्या लोटल्या. दोन टपऱ्या लोटून दिल्या तसेच संतप्त महिलांनी पोलीस चौकी येथे जाऊन पोलिसांना कोल्हार मधील सर्व अवैध व्यवसाय बंद करावे अशी मागणी करत निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे, की कोल्हार भगवतीपुर येथे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मटका ,जुगार अड्डे ,गांजा विक्री ,गोमांस विक्री खुलेआम चालू असून या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात अवैध पैसा उपलब्ध होत असून गावातील वातावरण दूषित होत आहे त्यामुळे गावातील अवैध धंदे त्वरित बंद करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तरी त्वरित कोल्हार येथील अवैध धंदे बंद व्हावे अशी मागणी यावेळी महिलांनी पोलिसांकडे केली आणि निवेदन दिले.
याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, पोलीस निरीक्षक काकड ,पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे ,आशिष चौधरी आदी पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.
Post a Comment