पुणे प्रतिनिधी : गणेश कुंभकर्ण

 पुणे येथील पंचतारांकीत जे डब्लु मेरीयट हॉटेल येथे शिर्डी विधानसभा मतदारसंघातील पुणे स्थित नागरीकांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनास अहिल्यानगरचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे महसुल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. दिवगंत उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.


 या कार्यक्रमास पुणे स्थित शिर्डी मतदारसंघातील नागरीकांची लक्षवेधी उपस्थिती होती. उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळे कार्यक्रम साधेपणाने संपन्न झाला व विखे पाटील यांनीही कुठल्याही प्रकारचा सत्कार स्विकारला नाही. या वेळी नामदार विखे यांनी नागरीकांची भेट घेतली,गप्पा -गोष्टी,स्नेहभोजन करत कार्यक्रम संपन्न झाला.


 यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सिनेट सदस्य सचीन गोर्डे यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड.विवेक लगड यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील मित्र मंडळाचे अध्यक्ष ॲड.विवेक लगड व उपाध्यक्ष मंगेश शिंदे व मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम केले.



Post a Comment

Previous Post Next Post