कोल्हार वार्ताहर : गणेश कुंभकर्ण प्रभू श्रीराम नवमी व राष्ट्रीय संत कैकाडी महाराज जयंती निमित्ताने कोल्हार भगवतीपुर येथील सकल हिंदू समाज व श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने येथील भगवती माता मंदिर प्रांगणात सुरू असलेल्या रामायणचार्य ह भ प संदीप महाराज चेचरे यांच्या सुस्राव्यवाणीतून सुरू असलेल्या संगीतमय राम कथा व सत्संग सोहळ्यात राम कथेवर आधारित सादर होत असलेल्या जिवंत प्रसंगांनी राम कथेत रंग भरला असून राम कथा श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले भाविक यामुळे मंत्रमुग्ध होत आहे 10 एप्रिल 2024 पासून सुरू झालेल्या राम कथेत प्रथम पुष्पात ग्रंथ महात्म, शिवपार्वती विवाह, दुसऱ्या पुष्पात श्रीराम जन्म, तिसरा पुष्पात श्रीराम सीता विवाह चौथ्या पुष्पा केवट कथा सांगण्यात आली सुस्राव्य संगीताची पार्श्वभूमी व कथेनुसार सादर करण्यात आलेले जिवंतप्रसंग या सर्वांमुळे रामकथेला उपस्थित असलेले भाविक कथा ऐकून मंत्रमुग्ध होत आहे जिवंत प्रसंग सादर करणाऱ्या कलाकारांचे रंगभूषा वेशभूषा लक्ष्मण महाराज करीत असून वादक शिवनाथ महाराज पवार माऊली महाराज झुराळे गायनाचार्य रविराज चेचरे कुबेर महाराज जगधने यांची साथ संगीतामुळे वातावरण भक्तीमय व मंगलमय होत आहे शनिवारी दुपारी चार ते सहा या वेळेत ह भ प इंदुरीकर महाराजांची किर्तन सेवा संपन्न झाली या संगीतमय तुळशी रामायण कथेची सांगता बुधवारी दिनांक 17 रोजी संदीप महाराज चेचरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने होणार आहे, बुधवारी सायंकाळी सहा वाजता भगवती उद्योग समूहासमोर स्टॅंडिंग मिरवणूक होणार आहे या संगीतमय राम कथेचा भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन कोल्हार भगवतीपुर येथील सकल हिंदू समाज व श्रीराम जन्मोत्सव समिती यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post