कोल्हार :-
महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (माफसू) व भाकृअप-राष्ट्रीय मांस संशोधन संस्था, हैदराबाद यांचे संयुक्त विद्यमाने अनुसूचित जमाती उपघटक योजने अंतर्गत क्रांतिसिंह नाना पाटील पशु वैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि सातारा व पशुसंवर्धन खाते अहिल्यानगर यांचे वतीने "एक दिवसीय शेतकरी -शास्त्रज्ञ संवाद तथा शास्त्रीय शेळी पालन प्रशिक्षण" कार्यक्रमाचे राजुर, ता. अकोले, जि. अहिल्यानगर येथे दिनांक २२ मार्च, २०२५ रोजी आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी अकोलेचे माननीय आमदार डॉ. किरण लहामटे व डॉ. सुखदेव बारबूधे संचालक भा कृ अ सं- राष्ट्रीय मांस संशोधन संस्था हैदराबाद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ अनिल भिकाने, संचालक विस्तार शिक्षण, माफसू, नागपूर, हे होते. व्यासपिठावर माफसू नागपूरचे कार्यकरणीचे सदस्य श्री रुषीकेश खांदे पाटील, डॉ. विकास वासकर, सहयोगी अधिष्ठाता तथा कार्यक्रम संयोजक, डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, डॉ दशरथ दिघे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, अहिल्यानगर, डॉ. बसवा रेड्डी, प्रमुख शास्त्रज्ञ, डॉ. योगेश गाडेकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, डॉ. गोकुळ सोनवणे, कार्यक्रम समन्वयक, डॉ. चंद्रशेखर मोटे, डॉ. साईनाथ भोकरे, डॉ. तेजस शेंडे, डॉ.अतुल पाटणे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, डॉ.अशोक धिंदळे,पशुधन विकास अधिकारी विस्तार यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करताना अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आदिवासी भागातील शेळीपालनाच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य केले. "अकोले तालुक्यातील आदिवासी समाजाने पारंपरिक शेळीपालनाच्या पुढे जात व्यावसायिक शेळीपालनाचा स्वीकार करावा. विशेषतः "शेळीपालन आणि पर्यटन यांचा योग्य समन्वय साधल्यास आदिवासी भागात नवे रोजगारनिर्मितीचे साधन उपलब्ध होऊ शकते. याशिवाय, शेळ्यांच्या आरोग्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि पोषण व्यवस्थापनाचा वापर केल्यास उत्पन्नवाढ होऊ शकते असे प्रतिपादन केले.
शेळीपालन व्यवसायामध्ये चांगल्या प्रतीच्या बोकडांची पैदास करून विविध प्रकारचे मूल्यवर्धित मांसल पदार्थ निर्मिती केल्यास त्याचा अधिक फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो असे प्रतिपादन डॉ बारबुध्दे यांनी केले आणि असे मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे सहकार्य त्यांच्या संस्थेमार्फत मिळेल व अनुसूचित जमाती उप घटक योजने मार्फत अधिक लाभ देण्यासाठी मदत करू असे ग्वाही त्यांनी दिली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. भिकाने म्हणाले की, सह्याद्रीच्या दुर्गम भागातील आदिवासी समाजासाठी शेळीपालन हे एक उपजिविकेचे मुख्य साधन असून शेळी पालनातून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी शेळीपालकानी नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करून शास्त्रीय पद्धतीने शेळ्यांचे संगोपन करावे असे आव्हान केले. शेळीपालन व्यवसायात यशस्वी होण्यासाठी शेळ्यांपासून अधिक पिले मिळवण्यासाठी सशक्त पैदास, करडांचे जन्मतःचे अधिक वजन घेणेसाठी गाभण शेळयाना पशुखादय देणे, करडातील मरतुक कमी करणे व करडांची वाढ वेगाने होण्यासाठी योग्य आहार व्यवस्थापन या चतुसुत्रीचा वापर करणे बरोबर शेळीचे दुध व लेंडीखत यांचेकडे उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून पाहिले पाहिजे .
मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. संयोजक डॉ.वासकर यांनी स्वागतपर भाषण केले तर कार्यक्रम समन्वयक डॉ. गोकुळ सोनवणे यानी प्रास्ताविक, सुत्रसंचलन डॉ. तेजस शेंडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.चंद्रशेखर मोटे यानी केले. कार्यक्रमात विविध विषयांवर तज्ज्ञांनी शेळीपालकांना मार्गदर्शन केले. डॉ.विजय कदम यानी प्रदर्शनी आयोजनासाठी पुढाकार घेतला. सखाराम गांगड व त्यांच्या सहकार्यांनी आदिवासी कांबड नृत्याचे सादरीकरण करून मान्यवरांचे मने जिंकली. हा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी अकोले तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी डॉ.अशोक धिंदळे व डॉ. जितेंद्र भांगरे यांनी अथक परिश्रम घेऊन उत्तम अंस नियोजन केलं.डॉ.राजेंद्र,
डॉ.शारदा, डॉ. निता दांगट, डॉ.प्रसाद शेळके, डॉ. जालिंदर लहामटे,डॉ.शुभांगी तसेच विद्यार्थी ऋषिकेश मोकळ, सुजित गंभिरे, आशिष ओहाळ, ओंकार भोर तसेच श्री.तानाजी देशमुख,श्री. हैबत भांगरे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केली. छायाचित्रनाची जबाबदारी रत्नाकर हिरेमठ यांनी पार पाडली. या संवाद कार्यक्रमास १६० आदिवासी महिला व पुरुष शेळीपालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.
Post a Comment