पुणे वार्ताहर: गणेश कुंभकर्ण
करोडो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची थायलंड मधील गणेश भक्तांनी हुबेहूब प्रतिकृती तयार करून त्यामध्ये दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना केली.
थायलंड मधील उद्योजिका व फुकेत9 रिअल इस्टेट कंपनीच्या चेअरमन मिस पापाचस्रोम मीपा
ह्या निस्सीम गणेश भक्त असून गेल्या अनेक वर्षा पासून त्या पुण्यात दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यास येत आहेत, त्यांची गणपतीवर खूप श्रद्धा आहे.
दगडूशेठ गणपती मंदिराची प्रतिकृती थायलंडमध्ये बनवून त्यामध्ये दगडूशेठ गणपतीची स्थापना करावी असा त्यांचा मानस होता, त्याप्रमाणे त्यांनी गेल्या 22 महिन्यापूर्वी थायलंड मधील फुकेत शहरात रवई बीच समोर मंदिर उभारण्याची सुरुवात केली, या मंदिराचे भूमिपूजन दगडूशेठ ट्रस्ट चे तत्कालीन उपाध्यक्ष व विद्यमान अध्यक्ष सुनील रासने ह्यांच्या हस्ते संपन्न झाले होते. साधारण दोन वर्षानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये मंदिराचे काम पूर्ण झाले.
ऑक्टोबर 2024 मध्ये दगडूशेठ मूर्तीच्या प्रतिकृतीची पारंपारिक पद्धतीने वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. व या मूर्ती बरोबर बनवण्यात आलेली शंकराची पिंड, सिद्धी व बुद्धी, लक्ष व लाभ, शंकर-पार्वतीची फायबरची मूर्ती श्रींची आभूषणे, वस्त्रे, अलंकार, आसन इ.
कंटेनर ने सागरी मार्गे थायलंडला पाठवण्यात आले.
30 दिवसांचा प्रवास करून कंटेनर थायलंडला पोहोचले.
या मुर्त्या व आभूषणे, अलंकार पुण्यामध्ये बनवून घेण्यामध्ये गणेश भक्त चेतन लोढा यांचा सक्रिय सहभाग होता.
28 डिसेंबर 2024 रोजी श्री. गणेश मूर्तीची पारंपारिक पद्धतीने पुणेरी ढोल ताशाच्या गजरात फुकेत शहरात रथ मिरवणूक काढण्यात आली, यावेळी फुकेत शहरातील गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी पुणे शहरातून खास ढोल ताशा पथक, फेटे बांधणारे कारगिर यांना निमंत्रित केले होते.
या मंदिराचे उद्घाटन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, सिद्धिविनायक ग्रुपचे चेअरमन राजेशकुमार सकला, सुवर्णयुग बँकेचे संचालक राहुल माणिकराव चव्हाण, या मान्यवरांच्या हस्ते झाले.
या मंदिरासाठी दहा कोटींहून अधिक खर्च लागला असून या मंदिराचे नामकरण त्यांनी लोर्ड श्रीमंत गणपती बाप्पा देवालय असे केले आहे. व हे मंदिर सर्व भक्तांसाठी खुले करण्यात आले असून रोज तिथे 500 हुन अधिक भाविक रोज दर्शन घेतात.
व या मंदिरामध्येही अभिषेक,गणेश याग, व इतर धार्मिक कार्यक्रम लवकरच सुरु होतील अशी माहिती चेतन लोढा यांनी दिली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची व मूर्तीची प्रतिकृती थायलंड मधील फुकेत शहरांमध्ये स्थापन झाली, यामुळे हिंदू धर्माची पताका सातासमुद्रपार अभिमानाने फडकत आहे. थायलंड मधील लोक हिंदू धर्माचा प्रचार प्रसार व बांधकाम करतात व दगडूशेठ गणपती मंदिराची हुबेहूब प्रतिकृती थायलंडमध्ये बनवली गेली या गोष्टीचा सार्थ अभिमान व आनंद आहे.
अशी प्रतिक्रिया दगडूशेठ ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी नगरी वार्ताशी बोलताना दिली.
व माझी दगडूशेठ गणपती बाप्पा वर प्रचंड श्रद्धा आहे, मी दर दर महिन्यातून एकदा दगडूशेठ गणपतीच्या च्या दर्शनाला पुण्यात येते माझ्या वैयक्तिक आयुष्यात व व्यवसायामध्ये चमत्कार होत गेले, बापाच्या कृपेमुळे व्यवसायाची प्रचंड भरभराट झाली त्यामुळे दगडूशेठ मंदिराची प्रतिकृती थायलंड मध्ये करावी असा मानस होता, व बाप्पाच्या कृपेने ती इच्छा पूर्ण झाली. अशी माहिती मिस पापाचस्रोम मीपा यांनी नगरी वार्ता चे संपादक गणेश कुंभकर्ण यांच्याशी बोलताना दिली.
Post a Comment