कोल्हार वार्ताहर : 

 राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी कै. शंकर बाबा शिरसाठ व कै. बाबूशेठ सिंघवी यांच्या प्रेरणेने सोमवार दि.२ डिसेंबर ते शनिवार दि.७ डिसेंबर पर्यंत चंपाषष्ठी निमित्त खंडोबा महाराज महात्म्य पोथीचे वाचन व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेसाठी जय मल्हार बचत गटाने ६०,००० रुपये देणगी दिली. खंडोबा महाराज यात्रोत्सव निमित्त मंदिरास कलर काम, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे अशी माहिती भक्त रामनाथ शिरसाठ यांनी दिली. शनिवार दि.७डिसेंबर रोजी सकाळी ७ वा श्रीक्षेत्र पुणतांबा येथून पायी कावडीने आणलेल्या गंगाजलाने खंडोबा मूर्तीस जलाभिषेक होईल. दुपारी ३वा काठीची अश्व,डफ, संबळवाद्य्या सह गावात मिरवणूक होईल. सायंकाळी ६ वा खंडोबा मंदिरासमोर १२ गाड्या ओढणे, वहिकाचा कार्यक्रम यानंतर महाप्रसाद रात्री ९ वाजता मंदिरासमोर जागरण गोंधळाचा कार्यक्रम या धार्मिक कार्यक्रमाचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाऊराव शिरसाठ,हरिभाऊ गाडेकर ,भागवत सत्रे, हरिभाऊ शिरसाठ, सुभाष अनाप, महिपती शिरसाठ, बाबा शिरसाठ, बाळासाहेब भोसले, संदीप शिरसाठ, सोमा अनाप, सदानंद शिरसाठ,अण्णा शिरसाठ,दत्ता शिरसाठ व जय मल्हार तरुण मंडळ यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post