कोल्हार वार्ताहर : 

 विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मतदार जनजागृती करीता नेवासा तालुक्यातील सोनई येथील मतदारदुत श्रेयस झरकर यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून निवडणूक आयोगाच्या अभ्यासपूर्ण माहिती मधून "लोकशाहीचे जनजागरण" व्हिडीओ मालिका तयार केली आहे. 



 यामध्ये लोकशाहीची दवंडी, उत्साही नवमतदार, मतदानाचे महत्त्व, व्हीव्हीपॅट व ईव्हीएम यंत्र तसेच विविध अॅड. मतदार सुविधा व हेल्पलाईनची माहिती आहे. नेवासेचे नायब तहसीलदार किशोर सानप व गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांनी श्रेयस झरकर यांचा सत्कार करुन कौतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post