कोल्हार वार्ताहर -
राहाता तालुक्यातील तिसगाव वाडी येथील मोठेबाबा देवस्थानाच्या यात्रा उत्सवास शुक्रवार दिनांक 15 /11/ 2024 रोजी प्रारंभ होत असल्याची माहिती देवस्थानचे पुजारी सुनील कालेकर यांनी दिली.
दिनांक 15/11 व दिनांक 16/112024 असे दोन हा यात्रा उत्सव चालणार आहे. यात्रा उत्सवानिमित्त शुक्रवारी सात वाजता गंगाजल पूजन व मोठेबाबांना अभिषेक महापूजा व महाआरती संपूर्ण होणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता काठीची संवाद्य मिरवणूक व शोभेचे दारू काम आठ वाजता अग्निहोम कार्यक्रम व त्यानंतर नऊ तीस वाजता भागिनाथ वाघे व त्यांचे सहकारी यांचा जागरण गोंधळ व पोवड्याचा कार्यक्रम संपन्न होईल शनिवारी 16 नोव्हेंबर रोजी दुपारी ४:३० वाजता कुस्ती हंगामा असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. यात्रा उत्सवानिमित्त मंदिराच्या कळसावर व मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मोठेबाबा देवस्थान नवसाला पावते त्यामुळे या देवस्थानाच्या दर्शनाला नेहमीच गर्दी असते मोठेबाबांना गोड भारताचा नैवेद्य भाविक भक्तांकडून अर्पण केला जातो. नुकताच मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून यात्रा उत्सव निमित्त मंदिराला रंग रंगोटी करण्यात आली आहे दोन दिवस चालणाऱ्या यात्रा उत्सवाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आव्हान मंदिराचे पुजारी सुनील कालेकर,आबासाहेब रांधवणे,शंकर खर्डे,संतोष कडू, आबासाहेब देवकर,जनार्दन कडू भाऊसाहेब बोऱ्हाडे यात्रा कमिटी सदस्य व तिसगाव वाडी ग्रामस्थांनी केले आहे
Post a Comment