श्रीरामपूर प्रतिनिधी :
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मतदार संघ हा प्रभू श्रीरामांच्या पवित्र नावाने नावलौकिक असलेला मतदार संघ असून अश्या मतदार संघात स्वच्छ व पारदर्शक कारभारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ कापसे यांना निवडून द्या असे आवाहन मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी श्रीरामपूर येथे मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांच्या बैठकीत केले.
पुढे बोलताना बाबासाहेब शिंदे म्हणाले की श्रीरामपूर मतदारसंघात रस्ते, पाणी, रोजगार, गुन्हेगारी अश्या प्रकारचे मुख्य प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालले आहे. काही राजकीय मंडळी आपल्या राजकीय स्वार्थासाठी कार्यकर्ते तयार करून निवडणूक झाल्यावर अश्या कार्यकर्त्यांना वेगळी वागणूक देतात केवळ मतदान प्रक्रियेदरम्यान बहुतेक तरुणांचा आपल्या हिताचा वापर व्हावा म्हणून काही राजकीय मंडळी अजूनही वापर करून घेत आहे मात्र याच तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, व्यवसाय सुरु व्हावा यासाठी मात्र कोणी लक्ष देत नाही श्रीरामपूर मतदार संघात कोट्ट्यावधी रुपयांचा विकास कामांचा पसारा झाल्याचे बोलले जात असून त्याच कोटी रुपयांच्या विकास कामांच्या बोलबालीवर आपला प्रचार काही उमेदवार करीत असले तरी मतदार संघात कुठेही अजून मूलभूत सुविधा अजून पोहचल्या नाही अजूनही बहुतेक गावात शेकडो सुशिक्षित तरुण बेरोजगार असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी सांगितले तसेच मनसे चे उमेदवार राजाभाऊ कापसे हे सत्तेत नसताना देखील गोर गरीब जनतेसाठी सदैव तत्पर असतात. कुठलाही स्वार्थ न ठेवता राजाभाऊ कापसे यांनी श्रीरामपूर मतदार संघात धार्मिक, शैक्षणिक, वैदिक, व व्यवसायिक क्षेत्रातील लोकांसाठी मदत केली आहे त्यामुळे सत्तेत नसताना जो माणूस निःस्वार्थ कामे करू शकतो तर तो माणूस निवडून आल्यावर विकास कामांचा डोंगर उभा केल्या शिवाय राहणार नाही त्यामुळे स्वच्छ व पारदर्शक कारभारासाठी मनसेचे उमेदवार राजाभाऊ कापसे यांना रेल्वे इंजिन या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी यावेळी केले.
पुढील भाषणात बोलताना मनसे चे उमेदवार राजाभाऊ कापसे म्हणाले की श्रीरामपूर मतदार संघातील माझी उमेदवारी ही मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या शिफारसनुसार मला मतदारसंघाची उमेदवारी दिली त्याचे आपण सोनं करू, श्रीरामपूर मतदार संघाच्या इतिहासात मनसेला प्रथम विधानसभेची उमेदवारी मिळाली आहे ही संधी सोडायची नाही मतदार संघातील तळागाळातील प्रलंबित प्रश्न,बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, रस्ते, शेती प्रश्न, गुन्हेगारी याकडे झालेले दुर्लक्ष आपण लक्ष करणार असल्याचे राजाभाऊ कापसे यांनी सांगितले. श्रीरामपूर शहरातील कित्तेक वर्षांपासून प्रलंबित असलेले छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, हनुमान मंदिर लगत असलेले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णकृती भव्य स्मारक व शहर, ग्रामीण भागातील थोर महापुरुषांचे स्मारक यासाठी खास प्रयत्न करणार आहे. श्रीरामपूर शहर व मतदार संघात जातीय सलोखा टिकून राहावा यासाठी देखील खास प्रयत्न करून खेडेगावाचे रस्ते शहरात भक्कम पणे जोडण्यासाठी मुख्य काम करणार आहे त्याचप्रमाणे राजसाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील ब्लु प्रिंट तयार करून मनसेचा झेंडा निश्चितच फडकविणार असल्याचे मनसेचे उमेदवार राजाभाऊ कापसे यांनी यावेळी सांगितले यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, डॉक्टर संजय नवथर मनसे जिल्हा सचिव, सतीश कुदळे मनसे शहराध्यक्ष,अमोल साबणे मनसे तालुकाध्यक्ष,नंदू गंगावणे मनसे कामगार सेना उपचिटणीस विकी कापसे माजी पंचायत समिती सदस्य,रॉकी लोंढे,राकेश कापसे, योगेश गायकवाड, सुनील रुपटक्के,निलेश सोनवणे मनसे सहकार सेना तालुकाध्यक्ष, विलास पाटणी मनसे कामगार सेना तालुकाध्यक्ष, भास्कर सरोदे मनसे माथाडी कामगार सेना तालुकाध्यक्ष,नितीन जाधव मनसे रोजगार सेना तालुकाध्यक्ष, अतुल खरात मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष, संकेत शेलार मनसे विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष, कुणाल सूर्यवंशी मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष, मारुती शिंदे, शिवाजी दांडगे, सुनील करपे, बाबासाहेब वाकचौरे, नितीन खरे, बाबासाहेब काळे, राजू शिंदे संदीप विशंभर सौरभ निर्मळ दीपक शेटे सुरेश शिंदे नंदू गंगावणे, बापू लबडे, श्याम सदाफळ,विकी परदेशी, प्रशांत गमले, सुमित चौधरी, फिरोज सय्यद, चेतन दिवटे, सागर शिंदे,उज्वला दिवटे, सुवर्णा ससाने, सुजित गायकवाड, लखन इंगळे,संतोष पवार, देवेंद्र मोरे,औदुंबर खरात, आकाश शिंदे राहुल शिंदे आर्यन शिंदे नितेश शिंदे सुमित शिंदे, संजय शिंदे,ऋषिकेश खरात, सचिन खरात, औदुंबर खरात, बाळासाहेब ढाकणे, संतोष निकम, योगेश ठोकळ, राजू लोखंडे, मार्गेश शिंदे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Post a Comment