कोल्हार प्रतिनिधी : गणेश कुंभकर्ण

 संगमनेर निळवंडे उजव्या कालव्याचे काम जाणीवपूर्वक अडकवून ठेवण्याचे काम इंद्रजित थोरात यांनी केले होते. या भागातील शेतक-यांना पाण्याचा लाभ होवू नये हीच त्यांची भूमिका होती. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर अवघ्या दोन महीन्यात या कालव्याचे काम सुरु करुन, शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्याचे काम झाले असे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. तालुक्यातील चिंचपूर आणि निमगावजाळी या गावांमध्ये आयोजित केलेल्या प्रचार सभेत मंत्री विखे पाटील बोलत होते. निळवंडे कालव्याच्या कामाचा उल्लेख करुन त्यांनी सांगितले की, वर्षानुवर्षे आ. थोरातांकडे सत्तास्थान होती. निळवंडेच्या प्रश्नावरुन त्यांनी अनेक निवडणूका जिंकल्या. पण शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत त्यांना पाणी नेता आले नाही. कालव्यांची कामे राहाता तालुक्यातील भागामध्ये होवूच द्यायची नाहीत हीच त्यांची भूमिका होती. उजव्या कालव्याच्या कामाचा ठेकाही त्यांचे बंधू इंद्रजित थोरात यांच्याकडेच होता. महायुती सरकार आल्यानंतर धरणाच्या मुखापासून कालव्यांची कामे सुरु झाली. मात्र जाणीवपूर्वक उजव्या कालव्याचे काम अडकवून ठेवले होते. या भागात कामं झाली. तर याचे श्रेय विखे पाटलांना मिळेल म्हणूनच काम होवू दिली जात नव्हती. 




परंतू कालव्यांच्या कामासाठी ठेकेदारांनी निर्माण केलेले अडथळे दूर करावे लागले. आधिकाऱ्याऱ्यांच्या बैठका घेवून यातून मार्ग काढला. त्यानंतर प्रत्यक्ष पाणी या कालव्यांमधून शेतकऱ्यांना आपण मिळवून देवू शकलो. महाविकास आघाडीमध्ये भावी मुख्यमंत्रीच खुप तयार झाले आहेत. काहींनी तर स्वतःचे फ्लेक्सबोर्ड लावून मीच मुख्यमंत्री म्हणून मिरवून घेतले असा टोला लगावून मंत्री विखे पाटील म्हणाले की, जनतेला पाणी मिळवून द्यायचे नाही पण जलनायक म्हणून मिरवून घ्यायचे ही यांची भूमिका आहे. कोणतीही विकास कामे संगमनेर तालुक्यात झाली नाही. कोव्हीड संकटात महाबिकास आघाडीकडून कोणतेही सहकार्य जनतेला झाले नाही. प्रवरेमध्ये कोव्हीड सेंटर सुरु झाल्यानंतर त्याचा दिलासा राहात्यासह संगमनेर तालुक्यातील नागरीकांनाही मिळाला. राजकारणाच्या पलिकडे जावून सामाजिक बांधिलकी जोपासण्याची परंपरा विखे पाटील परिवाराने जोपासली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post