कोल्हार वार्ताहर: गणेश कुंभकर्ण


 जिल्हा भकास करण्याबरोबरच जिल्ह्याचे पाणी पळवण्याचे काम ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. २००५ साली समन्यायी पाणी वाटप कायदा आणला आणि जिल्ह्याचे वैभव खऱ्या अर्थांनी पवारांनी नष्ट केले, विकासात्मक कामासाठी पवारांनी जिल्ह्यासाठी काय योगदान दिले? असा सवाल महसूल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थितांना करून, पवारांवर निशाणा साधला शिर्डी मतदार संघातील हनुमंतगाव आणि पाथरे या ठिकाणी आयोजित कार्यकत्यांशी संवाद साधताना मंत्री विखे पाटील बोलत होते. मंत्री विखे पाटील म्हणाले की,पवारांनी अनेक वर्ष केंद्रात आणि राज्यात नेतृत्व केले. जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतीही भरीव मदत केली नाही. आज तुम्हाला गोदावरी कालव्यांची आठवण झाली. पण तुम्ही ज्यांना घेवून फिरता त्यांनीच या जिल्ह्याच्या मानगुटीवर समन्यायी पाणी वा टप कायद्याचे भूत बसविले. त्यांना कधीतरी एकदा जाब विचारा. त्यांच्या चुकीमुळेच या जिल्हााचे पाणी कमी झाले, त्याचे परिणाम शेतकऱ्यांना आणि शेती क्षेत्राला भोगावे लागत आहेत. निवडणूका आल्या की, बाहेरच्या नेत्यांना जिल्ह्याची आठवण होते, परंतू जिल्ह्याच्या विकासासाठी आपण काय केले असा सवाल विखे पाटील यांनी केला. कोणतीही मदत आजपर्यंत केली नसल्याची टिका त्यांनी केली. बुद्धिभेद करून जनतेला फसवण्याचे काम त्यांनी आता थांबावले पाहिजे, असे सांगतानाच, निळवंडे धरणाचे भूमिपूजन शरद पवार यांनी चार वेळा केले. तरीही त्यांना हे धरण पूर्ण करता आले नाही उलट आ.थोरातांनीच त्यांच्या तालुक्यात कालव्यांची कामे होवू दिले नाही. अनेक वर्ष कालव्यांची कामे सुरु होण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत. महायुती सरकार आल्यानंतर हे काम सुरु झाले. केंद्र आणि राज्य सरकारने निधी उपलब्ध करुन दिला. कालव्यांच्या पुढच्या कामालाही आता ८०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहीती ना. विखे पाटील यांनी दिली. मोदी सरकारने लस देण्याबरोबरच शेतकरी, व्यापारी, सामान्य जनतेला आणि नोकरदारांना देखील विविध योजनेच्या माध्यमातून या संकटात मदत केली, आज शिर्डी मतदार संघात येवून आमच्यावर आरोप करणान्यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात शिर्डी मतदार संघासाठी कोणती मदत केली, हे एकदा सांगा. महायुती सरकारने तरी, तुमच्या तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला.

Post a Comment

Previous Post Next Post