श्रीरामपूर (प्रतिनिधी )
निवडणूक प्रक्रियेच्या प्रचाराच्या तोफा आता अंतिम टप्प्यात येत असताना 'मनसे'चे उमेदवार राजाभाऊ कापसे यांच्या 'रेल्वे इंजिन'ने आता सर्वांना प्रभावित केले असून कित्तेक वर्षांपासून निःस्वार्थ समाजसेवा करणाऱ्या राजाभाऊ कापसे यांना मतदारांकडून चांगला कौल मिळत आहे. राजाभाऊ कापसे यांच्या प्रचाराचा ताफा गावागावात जोरदार शक्ती प्रदर्शन करीत पोहचत आहे. मतदारसंघातील खेडेगावातील वाडी वस्तीवर मनसेचे उमेदवार राजाभाऊ कापसे आपल्या ताफ्यासह पोहचत आहे. खेडेगावातील विकास, शाळा कॉलेजसाठी भव्य सुसज्ज इमारत, अध्यवत सुविधा असलेले भव्य रुग्णालय, थोर महापुरुषांच्या विचारांची देवाण घेवाण साठी भव्य वाचनालय, गाव तेथे व्यायाम शाळा,घरकुल,स्वच्छता,पाणी, रोजगार,शेतीप्रश्न,शहर ते खेडेगाव भक्कम रस्ते,थोर महापुरुषांचे स्मारक,आदी सुविधा सह आपण पारदर्शक विकास कामे करू त्यासाठी 'तुमच्या राजाला साथ द्या' अशी साद प्रचारादरम्यान कॉर्नर सभेत राजाभाऊ कापसे यांनी मतदारांना घातली आहे.आपण स्थानिक उमेदवार असून गोर गरीब जनतेच्या सेवेसाठी आपली उमेदवारी आहे. राजकारण हा आपला मूळ उद्देश नसून राजकारणातून समाजकारण करने हे आपले मुख्य ध्येय आहे. त्याचप्रमाणे आपली लढाई ही राजकीय विरोधातील नसून सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी राजकारणातून समाजकारनासाठी असल्याचे राजाभाऊ कापसे यांनी सांगितले आहे.
Post a Comment