राष्ट्रसंत कमलमनी कमलेश यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री लक्ष्मी नारायण गोशाळा (आनंद दिवाकर तीर्थ ) दाढ खुर्द येथे सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 ते 8 एप्रिल 2024 दरम्यान उंचखडक (अकोले )येथील ह. भ.प. विठ्ठल पंत महाराज यांच्या सुमधुरवाणीतून श्री शिव महापुराण कथा ज्ञानज्ञ व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गोशाळा आयोजकाच्या वतीने देण्यात आली.
सोमवार दिनांक 1 एप्रिल2024 ते सोमवार दिनांक 8 एप्रिल2024 पर्यंत संपन्न होणाऱ्या या सोहळ्यात सकाळी सात ते अकरा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण ,संध्याकाळी पाच ते सहा हरिपाठ ,सात ते नऊ दिव्यश्री गौ कथा नंतर महाप्रसाद व हरिपाठ जागर असे दैनंदिन कार्यक्रम संपन्न होणार आहे. दिनांक 7 एप्रिल2024 रोजी रात्री 9:30 वाजता जालोर येथील श्री उत्तम पटेल यांच्या घागरीनृत्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सोमवार दिनांक 8 एप्रिल2024 रोजी सकाळी सात वाजता शिवपुराण कथा ज्ञान यज्ञ ग्रंथराज व ज्ञानेश्वरी ग्रंथाची सवाद्य मिरवणूक व दहा ते बारा या वेळेत तळोशी ( इगतपुरी )येथील ह. भ. प.रवींद्र महाराज गुंजाळ यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
श्री शिवपुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा तसेच गोशाळेच्या कार्यास तन-मन धन पूर्वक सहकार्य करावे असे आवाहन गोशाळा आयोजकाच्या व दाढ खुर्द ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment