पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय लोणी येथे प्रवरा लर्निंग रॉक मार्केटचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमात महाविद्यालयातील सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.एकूण 74 स्टॉल लावण्यात आले.या उपक्रमात एकूण 3,76, 990 रुपयांची उलाढाल झाली.भेळ, पाणीपुरी, कोल्ड कॉफी, चहा, गुळाचा चहा, पोहे ,इडली,अप्पे,वडापाव, भजी असे खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच लेडीज ॲक्सेसरीज, कुर्ती, जॉकेट, तसेच बाईक, ट्रॅक्टर सेल अशा विविध प्रकारच्या स्टॉलचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील तसेच संस्थेचे सेक्रेटरी श्री.भारत घोगरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रदीप दिघे ,कॅम्पस डायरेक्टर डॉ.राम पवार , उपप्रचार्य डॉ.भाऊसाहेब रणपिसे,डॉ.अनिल वाबळे,डॉ छाया गलांडे ,कार्यक्रमाचे कॉर्डिनेटर डॉ. विजय निर्मळ ,डॉ.रंजना दिघे,
कला शाखेचे कॉर्डिनेटर एस.बी.राजभोज ,सायन्सचे कोर्डिनेटर प्रा.एस.एस.पठाण व सर्व कमिटीतील सदस्य महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख ,प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.या कार्यक्रमप्रसंगी सौ शालिनीताई विखे पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की ,ग्रामीण भागातील गरज ओळखून आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त गोष्टींचा समावेश विद्यार्थ्यांनी या उपक्रमात करावा. फास्टफुडच्या जमान्यात बेकरी पदार्थांपेक्षा सकस आहार कसा राहील याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे.असे विद्यार्थ्यांना सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅम्पस डायरेक्टर डॉ.राम पवार यांनी केले.सदर उपक्रमाचे आभार डॉ.विजय खर्डे यांनी मानले.
या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Post a Comment