अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने ७५ हजार पुणेकर भाविकांनी अत्यंत भक्तिमय वातावरणात स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर रामरक्षा पठण केले.
भक्तिसुधा फाउंडेशन, समर्थ व्यासपीठ, शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने या कार्यक्रमाचे निमंत्रक होते.
या कार्यक्रमास महाराष्ट्र भाजपा प्रदेशअध्यक्ष, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह प्रविण दबडघाव, पुरातत्व आणि मूर्तिशास्त्राचे अभ्यासक गो. बं. देगलूरकर, कीर्तनकार चारुदत्त आफळे, अभिनेते राहुल सोलापूरकर, सुहास क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
Post a Comment