दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या गुन्हेगारांना लोणी पोलिसांनी दरोड्याचे साहित्य व धारदार शस्त्रासह राहता तालुक्यातील निर्मळ पिंपरी शिवारात जेरबंद केले
याबाबत सविस्तर असे की लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या आदेशानुसार ए. पी. आय. योगेश शिंदे पोलीस सब इन्स्पेक्टर आशिष चौधरी हेडकॉन्स्टेबल जोसेफ साळवे, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र इंगळे ,कॉन्स्टेबल निलेश सातपुते हे रात्रीच्या वेळी गस्त घालीत असताना लोणी येथून निर्मळ पिंपरी कडे जात असताना निळवंडे कालव्याच्या पुलाच्या पुढे त्यांना निर्जन ठिकाणी पाच इसम धारदार शास्त्रासहित जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना अडवून लुटताना तसेच दरोड्याचे उद्देशाने धारदार शस्त्रासह दिसून आले, गस्त घालत असलेल्या पोलिसांनी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न करीत असताना ते पळण्याच्या तयारीत असताना बाळू किसन गायकवाड (वय 31) राहणार- गणेश वाडी( शिर्डी ) , अजित विजय कुऱ्हाडे राहणार कोऱ्हाळे व एक बालक राहणार कालिका नगर शिर्डी यांना ताब्यात घेतले तर योगेश कुऱ्हाडे राहणार वडार गल्ली ,राहता व एक अनोळखी इसम मोटरसायकल वरून पसार झाला.ताब्यातील गुन्हेगारांकडून धारदार शस्त्रे, मिरची पावडर दोरखंड तसेच एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Post a Comment