कोल्हार वार्ताहर :- साईप्रसाद कुंभकर्ण

 कोल्हार येथे रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये २००३ चे वर्गमित्र एकत्रित आले आणि पुन्हा सर्व मित्र मैत्रीण यांची एक आनंदमय वातावरणात भेट झाली.निमित्त माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे होते इयत्ता १०वी २००३ च्या विद्यार्थ्यांकडून आपल्या बॅचसाठी ज्या शिक्षकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. अशा सर्व शिक्षकांना निमंत्रित करण्यात आलेले होते.याप्रसंगी व्यासपीठावर श्री जाधव बी.बी.सर , श्री लाळगे सर, श्री धुमाळ सर श्री नवाळे सर श्री लहरे सर श्री देवकर सर सौ राऊत मॅडम, मेढे मॅडम, यांंची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावर ज्येष्ठ शिक्षक जाधव बी.बी.सर हे होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रथमता दैनंदिन शाळेत ज्याप्रकारे राष्ट्रगीत व प्रतिज्ञा होत असते तशाच प्रकारे २००३ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी प्रथमतः व्यासपीठासमोर एकत्रित आल्यानंतर राष्ट्रगीत गायन व प्रतिज्ञा सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या महान कार्याचा गौरव करून प्रतिमा व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. मागील २० वर्षांत राष्ट्रसेवेत सीमेवर हौतात्म्य पत्कारलेले वीर जवान ,व मान्यवर परिवारातील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वच गुरुजनवर्गांचे सत्कार करण्यात आले.उपस्थित सर्व जेष्ठ गुरुजन वर्गांनी आजच्या काळातील आव्हाने त्याचबरोबर आजच्या तरुणांना भेडसावणाऱ्या समस्या त्याचबरोबर भावी जीवनात येणाऱ्या आव्हानांना कशाप्रकारे सामोरे गेलं पाहिजे याबाबत सर्वांनी विशेष मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी वीस हजार रुपये किमतीचे विविध वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके देऊन माजी विद्यार्थ्यांनी मदतीसाठी हात पुढे केला.रयत शिक्षण संस्थेमध्ये इयत्ता दहावी नंतर शिक्षण पूर्ण केल्यानंतर आज रोजी वेगवेगळ्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनी रयत शिक्षण संस्थेचे योगदान तसेच वाटचाल याविषयी मगोगत व्यक्त केले. त्याचबरोबर संपूर्ण कार्यक्रमांमध्ये उपस्थित असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी आपापल्या जीवन प्रसंगाचा जीवनपट उलगडून सांगितला त्याचबरोबर काही सुखदुःखाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला एकूण कार्यक्रमांमध्ये जवळजवळ ९० विद्यार्थ्यांचा सहभागी होते. त्यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या सहभागी होत्या.संपूर्ण सोहळा पार पडल्यानंतर माजी क्रीडा शिक्षक श्री. लाळगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पसायदानाने सोहळ्याची सांगता झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारिका निर्मळ ,श्रीराम दिमोटे ,मयुरा कोळपकर ,गणेश जाधव ,श्रावण चिंचोरे,नवनाथ कानडे ,सारिका निर्मळ ,आदिनाथ लकारे ,गणेश सोनवणे , निलेश काळे ,आदिनाथ लकारे आदी प्रयत्नशील होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संदिप राजभोज यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post