मिरजगाव ( प्रतिनिधी ) :-
 महात्मा फुले महाविद्यालय मिरजगाव येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बही : शाल शिक्षण मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेत व्याख्याते प्रा.साईप्रसाद कुंभकर्ण यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्र व कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी इतिहास कसा अभ्यासाचा याचे विवेचन केले. यावेळी बोलताना व्याख्याते प्रा.साईप्रसाद कुंभकर्ण म्हणाले की आजच्या काळात तरुण टि.व्ही . आणि मोबाईल मध्ये व्यस्त असून आजचा तरुण भरकटत आहे .आजच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्राचा अभ्यास करावा तसेच आजच्या तरुणांनी जिवनात ध्येय ,जिध्द , व्यवस्थापन , त्याग , शौर्य , अंगिकारले तरच उदयाचे भवितव्य उज्वल होईल छत्रपती संभाजी महाराजांनी हे सर्व गुण अंगिकारले. छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम स्फूर्तीदायी आहे आपल्या राजांनी बांधलेल्या गड किल्ल्याचे संर्वधन होणे गरजेचे आहे तुम्ही गड किल्ले अवश्य बघा पण त्या गड किल्ल्यात घाण करू नका ते स्वच्छ ठेवा तसेच तरूणानी व्यसनापासून दूर रहावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला .या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत मंडलिक होते. त्यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती संभाजी महाराजांच्या विविध पैलूंवर भाष्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक बहिशाल विभागाचे समन्वयक डॉ आप्पा माने यांनी केले. तर आभार डॉ अंकुश डोके यांनी मानले. या कार्यक्रमाला प्रा.प्रेरणा बिटे,प्रा.वडकर तसेच इतर प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post