पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मा. डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ अँड सोशल मेडिसीन, प्रवरा इस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस- अभिमत विद्यापीठ, लोणी व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी जागतिक एच.आय.व्ही. एड्स सप्ताह 2023 निमित्ताने प्रभात फेरी आयोजित करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.सी.सी. विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ. राजेंद्र पवार यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ.आर. ए. पवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रदीप दिघे यांनी प्रभात फेरीसाठी
विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
श्री.संतोष उबाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना संगितले की,1 डिसेंबर हा दिवस प्रत्येक वर्षी जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने एड्स या आजारासंबंधी जागरूकता वाढवणे, एड्स या साथीच्या संसर्गाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि एचआयव्ही विरुद्ध लढ्यात सहभागी होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. एड्स हा रोग ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस (एचआयव्ही)द्वारे होतो. एचआयव्ही शरीरातील रोगप्रतिकारक पेशी नष्ट करतो किंवा त्याचे नुकसान करतो. त्याबरोबरच जागतिक एड्स दिन काय आहे? जाणून घेऊया लक्षणे, कारणे आणि त्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रवरा इस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, लोणी येथील प्रकल्प व्यवस्थापक रविंद्र त्रिभुवन यांनी एड्स जनजागृती संदर्भात उपस्थित सर्वांना शपथ दिली. यावेळी मास्टर ऑफ सोशल वर्कच्या विद्यार्थांनी पथनाट्याद्वारे एड्स जनजागृती केली. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अनिल वाबळे ,डॉ.भाऊसाहेब रणपिसे, डॉ.छाया गलांडे ,प्रा.सोमसुंदरम (प्रकल्प संचालक), प्रा. डॉ. पालघडमल (प्रकल्प समन्वयक), डॉ.सुजाता लामखेडे, डॉ. विजय खर्डे, डॉ. डी. एन. तांबे, प्रा. प्रशांत हराळे, प्रा. शबाना शेख, प्रा. सुरभी भालेराव, प्रा.योगिता खर्डे व प्रा. सचिन लोखंडे यांनी मोलाचे सहकार्य केले. एड्स जनजागृती रॅलीनंतर कार्यक्रमाचे एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. बाळासाहेब मुंढे यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.
Post a Comment