कोल्हार (वार्ताहर ) : प्रा.साईप्रसाद कुंभकर्ण 

 लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये "संविधान दिन" साजरा करण्यात आला यावेळी प्रारंभी महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ.राम पवार यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.संविधान उद्देशिकाचे वाचन डॉ.खर्डे यांनी केले .याप्रसंगी डॉ राम पवार यांनी संविधानाविषयी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अनाप यांनी केले तर प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.सूर्यवंशी यांनी केले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे ,महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.भाऊसाहेब रणपिसे ,डॉ.अनिल वाबळे ,डॉ.छाया गलांडे ,श्री.एकनाथ सरोदे आदीसह प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.गावित यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post