कोल्हार :- (पत्रकार गणेश कुंभकर्ण) पुस्तक समाजाचं मस्तक असतं, पुस्तक कधीही कुणाचं हस्तक नसतं. जो पुस्तकापुढे नतमस्तक होतो, समाज त्याच्यापुढे नतमस्तक होतो. बोलावे मोजके आणि वाचावे नेमके, या उक्तीप्रमाणे वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो.आजच्या वर्तमानकाळात पुस्तके हे आमचे श्वास आहेत, असे मत प्रतिपादन प्रा.साईप्रसाद कुंभकर्ण यांनी केले. लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कोल्हार येथील ग्रंथालय विभागाच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या वाचन 'प्रेरणा दिन' समारंभात प्रा.कुंभकर्ण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच.आर. आहेर होते. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.सोपान शिंगोटे ,डॉ.पी डी पुलाटे , डॉ.अनिल पवार ,प्रा.लबडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, सेवक वृंद व विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ एच आर आहेर म्हणाले, "ग्रंथालय हा महाविद्यालयाचा आत्मा आहे. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ग्रंथालयातील पुस्तके तासनतास वाचली पाहिजेत. ग्रंथालयाच्या संकेतस्थळाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी ई-रिसोर्सचा अभ्यास करावा. महाविद्यालयातील ग्रंथालयांमध्ये विविध विषयाच्या संदर्भातील पुस्तके असून विद्यार्थ्यांनी फुरसतीच्या वेळचा उपयोग अवांतर वाचनासाठी करावा." या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सोपान शिंगोटे यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.संगीता धीमते व प्रा शँकर वडीतके यांनी केले. व डॉ.पी. डी. पुलाटे यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post