कोल्हार प्रतिनिधी : साईप्रसाद कुंभकर्ण
आयुर्वेद ही निसर्गाने दिलेली मोठी देणगी आहे. उत्तम आरोग्यासाठी आहार महत्वपूर्ण असून चांगला आहार घ्या निरोगी रहा असा संदेश आयुर्वेद तज्ञ डॉ. शशीकांत काळे यांनी दिला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून आयुष मंत्रालय भारत सरकार आणि लोणीच्या पद्यश्री विखे पाटील महाविद्यालयात आयोजित आयुर्वेद दिन आणि औषधी वनस्पती जनजागृती कार्यशाळेत डॉ. काळे बोलत होते यावेळी डॉ. मृणालिनी काळे, लोणीच्या माजी सरपंच सौ. मनिषा आहेर संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांत्रिकचे संचालक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदिप दिघे, कॅम्पस डायरेक्टर डॉ.राम पवार, डॉ.महेश खर्डे, जनसेवा फौडेशनच्या प्रकल्प संचालिका सौ. रूपाली लोंढे, महाविद्यालयाचे हर्बल प्रकल्पाचे समन्वयक उपप्राचार्य डॉ. अनिल वाबळे,उपप्राचार्य डॉ.भाऊसाहेब रणपिसे, उपप्राचार्य
डॉ. छाया गलांडे ,डॉ संजय गिरी आदीसह महीला बचत गटाच्या महीला उपस्थित होत्या.
आपल्या मार्गदर्शनात डॉ. काळे म्हणाले,निरोगी आहार निरोगी जीवन ही आजची गरज आहे.चुकीच्या आहारामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. भारतीय संस्कृतीत आयुर्वेद, विविध फळे, पालेभाज्या कंदभाज्या यांचे विशेष महत्व आहे असे सांगत काय खावे काय खावू नये यांवर मार्गदर्शन करतांनाच आयुर्वेदाचे महत्व समजून घेत सेंद्रीय आणि निसर्गातील विविध वनस्पती समजून घेत आहार आणि आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. प्रदिप दिघे यांनी ही कार्यशाळा आयुर्वेदाविषयी जनजागृतीसाठी महत्वपूर्ण ठरेल असे सांगून येणाऱ्या काळात संस्थेच्या माध्यमातून २५ शाळामध्ये हर्बल गार्डन ची उभारणी होणार असून आयुर्वेदाचे महत्व सांगितले. यावेळी डॉ मृणालिनी काळे यांनी विविध औषधी वनस्पती आणि त्याचा उपयोग यांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाॅ.वैशाली मुरादे आणि प्रा.हर्षदा खर्डे यांनी तर आभार डॉ अमोल विखे यांनी मानले.
Post a Comment