कोल्हार (वार्ताहर ) प्रमोद कुंभकर्ण यांचकडून तुळजापूरची भवानी माता माहूरची रेणुका माता कोल्हापूरची महालक्ष्मी अर्थात कोल्हारची भगवती माता व वनेची सप्तशृंगी माता अशा साडेतीन शक्तीपीठाच्या दर्शनाचा एकत्रित लाभ होत असलेल्या राहता तालुक्यातील श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपुरच्या भगवती मातेच्या नवरात्र महोत्सवास आज रविवार दिनांक 15 /10/ 2023 पासून मोठ्या भक्तीमय व मंगलमय वातावरणात प्रारंभ होत आहे. रविवारी सकाळी अभिषेक व पूजा विधी करून घटस्थापनेने भगवती मातेच्या शारदीय उत्सवास प्रारंभ होईल उत्सव काळात रोज पहाटे सव्वा पाच वाजता काकड आरती सायंकाळी सव्वा सात वाजता महाआरती दुपारी तीन वाजता देवी महात्म्य कथा वाचन तर सकाळी दहा ते बारा या वेळेत किर्तन सेवा तसेच कोल्हार भगवतीपुर देवालय ट्रस्ट आणि श्री स्वामी समर्थ केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मंदिरात श्री दुर्गा सप्तशती पाठ श्री स्वामी समर्थ जप नवार्णव जप आई साहेबांच्या उच्च कोटीची सेवा आदी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. नवरात्र महोत्सव निमित्त मंदिर सभा मंडप दीपमाळ व मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे पाचव्या व सातव्या माळेला कोल्हार भगवतीपुर येथील ग्रामस्थांकडून वाजत गाजत मिरवणुकीने जाऊन देवीला फुलोरा वाहिला जातो रविवार दिनांक 22 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा ते दहा या वेळेत होम हवन संपन्न होणार आहे. नवरात्र उत्सव यशस्वी करण्यासाठी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्ट चे अध्यक्ष सयाजी खर्डे उपाध्यक्ष साहेबराव दळे खजिनदार डॉक्टर भास्करराव खर्डे सचिव संपत कापसे एडवोकेट सुरेंद्र खर्डे विश्वस्त विजय निबे संभाजी देवकर लक्ष्मण खर्डे सर्जेराव खर्डे सुजित राऊत वसंत खर्डे यांचे सह सर्व विश्वस्त व ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. नवरा नवरात्र उत्सव काळात होणाऱ्या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर भगवती देवी मंदिराच्या गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे विश्वस्त व कोल्हार भगवतीपुरचे ग्रामस्थ यांच्या झालेल्या संयुक्तिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post