कोल्हार प्रतिनिधी : प्रा.साईप्रसाद कुंभकर्ण पद्मश्री विखे पाटील कला वाणिज्य महाविद्यालय लोणी प्रवरानगर येथे महिला सक्षमीकरण कक्षाच्या वतीने इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया ऑन स्टुडन्ट या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी फाउंडर आणि सि. इ.ओ अंलेंनसेक प्रायव्हेट लिमिटेड चे. श्री. ओंन्कार सोनवणे बोलत होते विद्यार्थ्यांनी फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडियाचा वापर करताना योग्य ती खबरदारी घ्यावी ॲप डाऊनलोड करताना परमिशन तपासून घ्याव्यात व फक्त ट्रस्टेड ॲप्स डाऊनलोड करावेत कोणत्याही लिंक आल्यानंतर अगोदर कॉपी कराव्यात आणि नंतर पेस्ट कराव्यात कुठल्याही ऑनलाईन जाहिरातीला रिस्पॉन्स देताना पडताळून पहाव्यात आपली फसवणूक होत नाही ना? याची काळजी घ्यावी यासाठी त्यांनी लुडो गेम्स, माणिक शॉप सारखे लाईव्ह फिशिंगचे उदाहरणे देऊन स्पष्ट केले त्याचबरोबर आपल्या अकाउंटचा पासवर्ड स्ट्रॉंग कसा ठेवावा हेही स्पष्ट करून सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य, डायरेक्टर ऑफ एज्युकेशन पी. आर. इ.एस आणि सिनेट सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे डॉ. प्रदीप दिघे, कॅम्पस डायरेक्टर डॉ.राम पवार, उपप्राचार्य डॉ.अनिल वाबळे, डॉ.भाऊसाहेब रणपिसे, डॉ.छाया गलांडे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आजच्या डिजिटल युगामध्ये स्वतःची फसवणूक होण्यास आपणच जबाबदार कसे आहोत ह्या बाबत अनेक उदाहरणे देऊन सांगितले व विद्यार्थ्यांनी या डिजिटल युगात कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची योग्य ती खबरदारी घ्यावी असे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ छाया गलांडे यांनी केले प्रमुख पाहुण्यांची ओळख महाविद्यालयाच्या महिला सक्षमीकरणाच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पलघडमल यांनी करून दिली व आभार डॉ. वैशाली मुरादे यांनी मांडले याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी त्याचबरोबर शिक्षक स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post