ठाणे इथून गोळीबार करुन फरार झालेले आरोपी कोल्हार येथे जेरबंद
कोल्हार वार्ताहर- (साईप्रसाद कुंभकर्ण)
ठाणे येथे दोघांवर गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीस कोल्हार येथे जेरबंद करण्यात डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाला यश आले आहे . ठाणे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत 13 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री नऊ तीसच्या सुमारास सुरज देवराम ढोकरे याने अजीज असलम सय्यद व त्याचा आते भाऊ फिरोज रफिक शेख यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने सरकारी पिस्तूल मधून गोळ्या झाडल्या होत्या, आज सदर आरोपी नगरहून नाशिक येथे जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली त्यांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला ताब्यात घेण्यासाठी तीन पथके तयार करून राहता तालुक्यातील कोल्हार येथे नाकाबंदी करून आरोपीला कोल्हार बस स्थानकावरून मोठ्या सिताफिने ताब्यात घेतले.
व त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल जप्त केली सदर आरोपी मुंबई येथे पोलीस दलात नायगाव पोलीस मुख्यालयात नोकरीस आहे. सदरची कार्यवाही अधीक्षक राकेश ओला, स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली डी वाय एस पी संदीप मिटके ,लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे! पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे व लोणी पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.
ठाणे इथून गोळीबार करुन फरार झालेले आरोपी कोल्हार येथे जेरबंद
टीम नगरी वार्ता
0
Comments
Post a Comment