पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून व महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात “मेरी माटी मेरा देश” अभियान "राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजना " विभागाच्या वतीने राबवण्यात आले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
या उपक्रमाचा उद्देश देशाच्या प्रति मान व आदर व्यक्त करत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग या उपक्रमात नोंदविला.
पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात अमृत कलश रथ आल्यानंतर या रथाचे स्वागत करण्यात आले
या अभियानाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रदीप दिघे व कँप्स डायरेक्टर डॉ.राम पवार यांनी
करून या उपक्रमाच्या विषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
व उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.भाऊसाहेब रणपिसे ,उपप्राचार्य डॉ.अनिल वाबळे,डॉ.छाया गलांडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच प्राध्यापकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बहुसंख्येने राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक,राष्ट्रीय छात्रसेवेचे विद्यार्थी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमास मोठ्या उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
Post a Comment