कोल्हार : गणेश कुंभकर्ण
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ (कला) महाविद्यालय कोल्हार बुद्रुक ता. राहाता जि. अहमदनगर येथे रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष माननीय आमदार आशुतोष काळे व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री अरुण कडू पाटील व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष व माजी सरपंच अॕड. सुरेंद्र खर्डे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची 136 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीता मधून सर्व अतिथींचे स्वागत केले. त्यानंतर सौ.अनुराधाताई पाटणकर यांच्या देणगीतून व ग्रामस्थ आणि सर्व सेवकांच्या देणगी मधून बारा लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नूतन स्वच्छता गृह इमारतीचे उद् घाटन रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष आमदार अशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर विद्यालयाचे प्राचार्य सुधीर वाघमारे सर यांनी विद्यालयाने केलेल्या प्रगतीची माहिती दिली व अहवाल वाचन करून प्रमुख अतिथींचे स्वागत केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष आमदार आशुतोष काळे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील व इतर मान्यवरांचा सत्कार विद्यालयातील स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष व स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य यांच्या शुभहस्ते करण्यात आला याबरोबरच विद्यालयास देणगी देणारे सौ अनुराधाताई पाटणकर श्री रामनाथ बोरसे मामा व श्री काशिनाथ नलगे, सुनील भणगे यांचा सत्कार करण्यात आला यानंतर विद्यालयातील शिक्षक शब्बीर शेख सर यांनी ज्या थोर दानशूर व्यक्तींनी संस्थेकडे कायम ठेव ठेवलेली आहे व रोख रक्कम स्वरूपामध्ये जे बक्षीस देतात अशा दानशूर व्यक्तींच्या नावाची यादी वाचून दाखविली यानंतर इयत्ता दहावी मध्ये प्रथम येणारे तीन विद्यार्थी इयत्ता बारावी मध्ये प्रथम येणारे तीन विद्यार्थी तसेच इयत्ता दहावी मध्ये प्रत्येक विषयामध्ये प्रथम येणारा विद्यार्थी व विद्यालयातील आदर्श विद्यार्थी व आदर्श विद्यार्थिनी यांना दानशूर व्यक्तींनी ठेवलेली रक्कम रोख स्वरूपामध्ये बक्षीस देण्यात आले माधवराव खर्डे पाटील स्मृती जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये लहान गट व मोठ्या गटांमध्ये प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपाचे बक्षीस व ट्रॉफी, प्रमाणपत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले त्यानंतर स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष माजी सरपंच अॕड. सुरेंद्र खर्डे पाटील यांनी विद्यालयामधील समस्या मांडून विद्यालय कशा पद्धतीने प्रगती करत आहे याचा लेखाजोखा मांडला व विद्यालयास आर्थिक मदतीची गरज असून विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असे अत्याधुनिक स्वच्छतागृह बांधण्यासाठी संस्थेने आर्थिक मदत करावी अशी मागणी अॕड.सुरेंद्र खर्डे पाटील यांनी केली.
या नंतर आमदार अशुतोष काळे यांनी बोलताना सांगितले की पूर्वी मुली शिक्षणात मागे असायच्या त्या वेळच्या सामाजिक बंधनामुळे, मात्र कोल्हार च्या रयत शाळेत जवळजवळ 90% मुलीच बाजी मारत आहेत हे या पारितोषिक वितरणामध्ये दिसून आले. मुलांनी याचा विचार करून मुलींच्या बरोबरीने पुढे जायला हवे कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्रात रयतेच्या माध्यमातून ज्ञानाची गंगा तळागाळात पोहोचवली याचा सदुपयोग रयतेच्या गोरगरीब मुलांनी केल्यास हीच खरी श्रद्धांजली कर्मवीरांना ठरेल असे प्रतिपादन त्यांनी केले रयत संस्थेत दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी सदैव अग्रेसर राहील असे आश्वासन मी देतो रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच संस्था पातळीवर कोल्हार शाखेसाठी जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न मी करेल असे मत त्यांनी व्यक्त केले यानंतर रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना अरुण कडू पाटील म्हणाले शिक्षणाची पायाभूत व्यवस्था करणे, ग्रामीण भागात खरी ज्ञानाची गंगा कर्मवीरांनी आणली, मात्र आज शिक्षण महाग झाले आह.
ग्रामीण भागात आता पहिल्यासारखी परिस्थिती नसून अनेक शिक्षण संस्था उदयास आल्या आहेत तेथे खूप खर्च असल्याने आता विनामूल्य शिक्षण मिळेनासे झाले आहे विनामूल्य शिक्षण आपला हक्क असून शासनाकडून विनामूल्य शिक्षण हवे असेल तर शासना सोबत झगडावं लागेल असे अरुण कडू पाटील यावेळी म्हणाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पल्लवी शिंदे व शब्बीर शेख यांनी केले आभार विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती संजीवनी आंधळे यांनी मानले या कार्यक्रमासाठी भाऊसाहेब शिरसाठ, अण्णासाहेब साबळे, शिवधन पतसंस्थेचे चेअरमन अजित मोरे, उद्योजक सुनील भणगे, बी के खर्डे, रामनाथ देवकर, भाऊसाहेब प्रभाकर खर्डे, वसंत नानासाहेब खर्डे, किशोर निबे, अरुण बाळासाहेब खर्डे, भाऊसाहेब प्रभाकर खर्डे, सुनील खर्डे, पांडुरंग देवकर, प्रभाकर खर्डे, माजी प्राचार्य आंधळे सर, सोनवणे सर, गमे जी.टी. सर मुख्याध्यापक चव्हाण सर व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्थेत दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव अग्रेसर राहील : आमदार अशुतोष काळे
टीम नगरी वार्ता
0
Comments
Post a Comment