प्रवरानगर येथील रयत शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा
कोल्हार प्रतिनिधी (पत्रकार गणेश कुंभकर्ण)-
राहता तालुक्यातील प्रवरा नगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला .याप्रसंगी डॉक्टर एपीजे कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले, व विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी दैनिक पुढारी वृत्तपत्राचे वाचन केले. तसेच विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले दैनिक पुढारी च्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमास परिसरातील अनेक विद्यालयात चांगला प्रतिसाद मिळाला विद्यालयाचे प्राचार्य काकडे सर शेळके सर कन्या विद्यालयाच्या प्राचार्या क्षेत्रे दैनिक पुढारीचे कोल्हार भगवतीपुर येथील प्रतिनिधी प्रमोद कुंभकर्ण ज्ञानेश्वर दुधाडे भुसाळ सर यांचे सह विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment