कोल्हार प्रतिनिधी :- साईप्रसाद कुंभकर्ण

 देशाचा तिरंगा का सदैव उंच रहावा यासाठी संघटीत कार्याची गरज आहे हेच काम प्रवरेतून होत आहे. देशासाठी प्रवरेचे कार्य महत्वपूर्ण राहीले आहे. आज प्रवरेचा विद्यार्थी सर्वपातळीवर आघाडीवर आहे असे प्रतिपादन माजी मंञी अण्णासहेब म्हस्के पाटील यांनी केले. प्रवरा औद्योगिक, शैक्षणिक,आरोग्य सांस्कृतिक समुहाच्या वतीने लोणीच्या डॉ. विखे पाटील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रम माजी मंत्री म्हस्के पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालीनीलाई विखे पाटील, पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलासराव तांबे, प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, कर्नल भागवत, कर्नल विजयकुमार, कर्नल जोशी, संस्थेचे संचालक भाऊसाहेब ज-हाड, गणपतराव शिंदे, दिघे, किशोर नावंदर, गोविंदराव जवरे,सौ अलका दिघे, दादासाहेब घोगरे, संस्थेचे सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांञिकचे संचालक डॉ. प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे, कृषि संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. शुभांगी साळोखे आदीसह प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. 



 आपल्या मार्गदर्शनात माजी मंञी म्हस्के पाटील म्हणाले, देशाने सर्वधर्म समभावाची शिकवण जगाला दिली आहे. देशाने केलेली प्रगती ही सर्वसमावेशक अशीचं राहीली आहे. आज देश जागतिक पातळीवर प्रगती पथावर असल्याचे सांगितले. प्रारंभी एन. सी. सी, तसेच विविध शाळा महाविद्यालये, प्रवरेतील सुरक्षा पथक यांनी शानदार संचालन करत मानवंदना दिली. सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे भारतीय संस्कृती, परंपरा, लोककला,देशभक्तीपर गिते. त्याच बरोबर अंधश्रध्दा,महीला अत्याचार, स्त्री भ्रुणहत्या, सामाजिक ऐक्य,चंद्रयान मोहीम,बदलता शेतकरी,वीर जवान यांवर विविध शालेय विद्यार्थ्यानी प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले. 


विविध क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी केलेल्या प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांना यावेळी मान्यवरांनी सन्मानित केले. १४ ऑगस्ट १९४७ या रोजी देशाची फाळणी झाली होती. या फाळणीचा इतिहास नव्या पिढीच्या समोर यावा म्हणून विभाजन विभीषिका अर्थात स्मृती दिवसाच्या निमित्ताने प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात फाळणीसंबंधी सर्व माहिती आणि फाळणीच्या फोटोंमागील इतिहास विद्यार्थ्यांना माहीत व्हावा यासाठी आयोजित केलेल्या फोटो प्रदर्शाची पाहणी ही मान्यवरांनी केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार डॉ शांताराम चौधरी यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post