कोल्हार प्रतिनिधी : साईप्रसाद कुंभकर्ण "शाहू विचारांना देऊ या गती, साधूया सर्वांगीण प्रगती" या ध्येयाने स्थापन झालेल्या 'सारथी ' अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे. या संस्थेच्या विविध योजनांची माहिती व माहितीपत्रकाचे चावडी वाचन करण्यात यावे असे आदेश सरकार व सारथी संस्थेकडून देण्यात आले होते. १४ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या दुर्गापूर येथील ग्रामसभेत सारथीचे लाभार्थी व सारथी संशोधक विद्यार्थी गोपाळे स्वप्निल दामोदर यांनी सारथी मधील सर्व योजनांची माहिती ग्रामसभेला उपस्थित असणाऱ्या सर्व ग्रामस्थांना दिली. सारथी योजनांच्या प्रचार व प्रसारामुळे सारथीच्या लक्षित गटातील लाभार्थ्यांना सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी निश्चितच फायदा होईल. या ग्रामसभेत माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री छगनराव पुलाटे, राहता तालुका दूध संघ संचालक श्री. नानासाहेब पुलाटे, दुर्गापुर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब पुलाटे उपसरपंच सौ. दमयंती पुलाटे, , श्री अंबादास पुलाटे ग्रामसेवक श्री शिंदे एस.आर, तलाठी श्री. कानडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post