कोल्हार वार्ताहर- (साईप्रसाद कुंभकर्ण )
कोल्हार येथील आठवडे बाजारात मोबाईल चोरीच्या उद्देशाने आलेल्या तीन चोरट्यांना कोल्हार पोलीस व नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात यश आले. याबाबत सविस्तर असे की, शुक्रवार हा कोल्हार भगवतीपुर या गावचा आठवडे बाजाराचा दिवस आहे. दर शुक्रवारी आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोऱ्या होत आहेत. शुक्रवार दिनांक 18 /8/ 2023 रोजी सायंकाळी आठवड्या बाजारात पाच ते सहा तरुण चोरीच्या हेतूने बाजारात फिरत असताना लोणी पोलीस स्टेशनचे पीएसआय आशिष चौधरी व कोल्हार पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार बाबासाहेब लबडे यांना या तरुणांचा संशय आला त्यांनी भगवतीपुर ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या नजीक त्या संशयित तरुणाला हटकले असता तो व त्याचे साथीदार पळून जात असतानाच पोलिसांनी सतीश चक्रे व भोंडे तसेच इतर ग्रामस्थांच्या मदतीने तीन तरुणांना पकडले तर इतर दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या तरुणांना पोलिसी खाक्या दाखवताच या तरुणांनी आठवडे बाजारात मोबाईल चोरीच्या उद्देशाने आले असल्याची कबुली दिली.
सुंदर बापू गुंजाळ (वय 22,राहणार बीड )अनिल मोहन गुंजाळ( वय 24 राहणार बीड) व साईनाथ दशरथ चव्हाण राहणार( वय 20 राहणार बिडकीन )अशी या तरुणांची नावे आहेत. मात्र या तरुणांकडे कोणताही मुद्देमाल आढळून आला नसल्याचे कोल्हार पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार बाबासाहेब लबडे यांनी सांगितले. दर शुक्रवारी आठवडे बाजारात मोबाईल चोरीचे सत्र चालूच असल्यामुळे कालच्या आठवडे बाजारात मात्र ग्रामस्थ व पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोबाईल चोरीचे प्रयत्न फसले. मात्र दर शुक्रवारी आठवडे बाजारात पोलिसांनी अशी सतर्कता दाखवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी कोल्हार भगवती पूर चे नागरिक करीत आहेत.
कोल्हार आठवडे बाजारात मोबाईलचोरांना नागरिकांच्या सतर्कतेमुळे अटक
टीम नगरी वार्ता
0
Comments
Post a Comment