कोल्हार वार्ताहर- साईप्रसाद कुंभकर्ण 

 अनैतिक संबंध ठेवणाऱ्या इसमा कडून महिलेच्या मुलाला झालेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हार लोणी रोडवर खर्डे वस्ती शुक्रवारी सायंकाळी च्या सुमारास घडली याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मनीषा विठ्ठल माळी राहणार डिग्रस तालुका राहुरी हिचे भाऊसाहेब सिताराम बर्डे यांच्याशी आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते परंतु नवरा बायकोचे जमत नसल्यामुळे सततच्या होणाऱ्या वादामुळे मनीषा माळी हे डिग्रस येथे नवऱ्याला सोडून आत्याकडे राहण्यासाठी होती या दरम्यान तिचे अंकुश अनिल बर्डे राहणार हिवरे बाजार तालुका पारनेर हल्ली मुक्काम डिग्रस यांच्याशी ओळख झाली व मनीषा तिच्या दोन मुलासमवेत अंकुश बर्डे सोबत राहू लागली. अनैतिक संबंधात मुलांचा अडथळा म्हणून मनीषा मुलांना घेऊन बहिणीकडे सोडण्यासाठी चालली असता विशाल भाऊसाहेब बर्डे या सहा वर्षे मुलाने आईकडे आग्रह धरला की मला मावशीकडे जायचे नाही काकाकडे नेऊन सोड व तो रडायला लागला विशालचा काकांकडे जाण्याचा आग्रह थांबत नव्हता व त्याचे रडणे थांबत नव्हते त्यामुळे अंकुश बर्डे याने विशालला मारण्यास सुरुवात केली कोल्हार लोणी रस्त्यावर खर्डे यांच्या वस्ती नजीक मारहाण करताना विशाल च्या जिव्हारी टोला बसल्याने त्यातच विशालचा तेथे मृत्यू झाला. त्यानंतर मनीषा व अंकुश यांच्यामध्ये वाद झाले व अंकुश ने मनीषाला ही मारहाण केली तिने सरळ लोणी पोलीस स्टेशन गाठले व त्या ठिकाणी अंकुश बर्डे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली विशालच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल अंकुश बर्डे यांच्यावर खुनाचा चा गुन्हा दाखल करण्यात आला असून लोणी पोलीस स्टेशनचे सपोनी योगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल दहिफळे हे अधिक तपास करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post