कोल्हार प्रतिनिधी (गणेश कुंभकर्ण )- 

 लोकनेते पद्यभूषण डॉ. बाळासाहेब विखे पा. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिरिंग विभागाचे सहाय्यक प्राध्यापक श्री शकिल शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रदान करण्यात आली. "इफिशियन्ट ऑब्जेक्ट डिटेक्शन अँड ट्रॅकिंग फॉर फुल हाय-डेफिनेशन व्हिडिओ” या विषयावर त्यांनी शोधनिबंध सादर केला होता. यामध्ये सर्वायलन्स सिस्टम, सुरक्षा यंत्रणा, लष्करी ॲप्लिकेशन इत्यादीमध्ये हाई रिझोल्यूशनसह आधुनिक इमेजिंग सेन्सर वापरतात, त्यामुळे रिअल टाइममध्ये ऑब्जेक्ट शोधण्यासाठी आणि ट्रॅक करण्यासाठी हि सिस्टम विकसित केली आहे. नाशिक येथील मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे प्रा. डॉ. जयंत चोपडे व प्राचार्य डॉ. गजानन खराटे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. डॉ. शेख हे हसनापूर येथील रहिवासी आहेत. त्यांना अभियांत्रिकी क्षेत्रात 33 वर्ष प्रदीर्घ सेवेचा अनुभव असून त्यांनी विद्यापीठातील विविध वर्कशॉप मध्ये तज्ञ म्हणून मार्गदर्शन केलले आहे. संस्थेचे अध्यक्ष राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी डॉ. शकील शेख यांचा सत्कार केला. यावेळ हसनापूरचे उपसरपंच श्री. अफजल पटेल, माजी सरपंच श्री नसीर पटेल, समीर पटेल व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल ज़िल्हापरिषदेच्या अध्यक्षा नाम. सौ. शालिनीताई विखे पाटील, मा. खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननिय डॉ. शिवानंद हिरेमठ , सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील, प्रवरा इंजिनीरिंगचे प्राचार्य. डॉ. संजय गुल्हाने यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post