ध्येय,जिद्द व उत्तम व्यवस्थापन छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते. म्हणूनच महाराजांनी अनेक असाध्य गोष्टी साध्य करून हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पूर्ण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन शिवचरित्र व्याख्याते प्रा. साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण यांनी केले झरेकाठी येथे शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती निमित्त आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते यावेळी आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये,विनोद गंभीरे, पत्रकार प्रमोद कुंभकर्ण,सायली हारदे,जानवी कुंभकर्ण आदीसह शिवजयंती महोत्सव समितीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवजयंती महोत्सव समिती व झरेकाठी ग्रामस्थांच्या वतीने
आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये,विनोद गंभीरे, शिवचरित्र व्याख्याते प्रा.साईप्रसाद कुंभकर्ण,पत्रकार प्रमोद कुंभकर्ण यांचा सत्कार करण्यात आला.शिवप्रतिमा पूजन व शिव आरती करण्यात आली. सायली हरदे हिने मनोगत व्यक्त केले.
Post a Comment