लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात इतिहास विभाग आयोजित हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणा वाव मिळण्यासाठी दि.१६ व १७ फेब्रुवारी रोजी निबंध स्पर्धा ,वकृत्व स्पर्धा ,पोवाडा गायन , सामान्य ज्ञान स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेल होते
या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून स्पर्धेची शोभा वाढवली तसेच दिनांक १९ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयामध्ये शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले .याप्रसंगी महाविद्यालयातील पदार्थ विज्ञान विभागातील प्रा. शिवाजीराव अनर्थे यांचे शिवचरित्रावर व्याख्यान संपन्न झाले . तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम दिघे यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवन व महान कार्याचा परिचय करून दिला .
याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रो.डॉ. आर.जी रसाळ व सौ प्रा. गलांडे मॅडम उपस्थित होत्या .तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर सर्व सेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हर्षल खर्डे,व आभार प्रा.ए.आर गावित यांनी मानले. इतिहास विभागाद्वारे आयोजित केलेल्या विविध स्पर्धेचे आयोजन समितीमध्ये व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख डॉ. अशोक बिडगर , प्रा. संदीप राजभोज ,प्रा. साईप्रसाद कुंभकर्ण ,प्रा.सौ.डॉ. एस .एम वाकोळे व प्रा.सौ.डॉ.एस.एस तुपे यांनी विशेष प्रयत्न केले.
Post a Comment