शिवकालीन इतिहासातील अनेक प्रसंग युवकांना प्रेरणा देतात. संकटाला न घाबरता नियोजनबद्ध काम करा. महाविद्यालयीन जीवनात चांगले सहकारी निवडा. महाराजांचे आदर्श जीवन डोळ्यासमोर ठेवा. विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येय ठेवून जिद्दीने नियोजनपूर्वक प्रयत्न केल्यास स्वप्नपूर्ती होते. हाच बोध शिवरायांच्या व्यवस्थापन निती मधून आपणास मिळतो, असे मत प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण यांनी व्यक्त केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सर्वात तेजस्वी योद्धा आणि सर्वोत्तम रणनीतीकार, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त 'श्री शिवजन्मोत्सव सोहळा' साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) प्रभाकर डोंगरे होते.
अध्यक्षीय सूचना गगन अंबादास लोंढे यांनी मांडली. नियोजन समितीचे अध्यक्ष महेश नानासाहेब लोंढे यांनी अनुमोदन दिले. प्रास्ताविक महेश सिनारे यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात शिववंदन व शिवआरतीने करण्यात आली. याप्रसंगी पेढे वाटून व फटाक्यांची आतिषबाजी करून शिवजन्माचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर गाणी-पोवाडा सादरीकरण केले. हारदे सायली माधव, नागरे मयुरी अशोक, हारदे प्रियंका अंबादास, मयुरी सिनारे, प्रशांत सुभाष खाटेकर, अनिकेत संजय बेलकर या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
'शिवरायांसी का आठवावे..?' याविषयी बोलताना सुप्रसिद्ध वक्ते प्रा. साईप्रसाद कुंभकर्ण यांनी शिवकाळातील अनेक रोमांचकारी प्रसंग सोदाहरण कथन केले. प्राचार्य प्रो. डॉ. प्रभाकर डोंगरे यांनी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे शिवजयंती महोत्सव साजरा करून कार्यक्रम संयोजन कौशल्याच्या जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांनी शिस्तीत स्वतः पार पाडल्याबद्दल कौतुक केले. या कार्यक्रमाचे आभार उद्धव लोंढे यांनी मानले.सूत्रसंचालन बेलकर वैष्णवी, ताजणे आरती यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष महेश नानासाहेब लोंढे, उपाध्यक्ष पृथ्वीराज राजेंद्र घोलप,अक्षय बाळासाहेब दिघे, अश्विनकुमार रावसाहेब सजगुरे, शुभम संजय सूर्यवंशी, महेश बाळासाहेब सिनारे, रोहन संजय मुसमाडे, मोईन अन्सार शेख, महेश राजेंद्र दिघे, अक्षय बाळासाहेब नेहे, तेजस दादासाहेब गागरे, कृष्णा बाळासाहेब अडसुरे, सिद्धार्थ दत्तात्रय कडू, अक्षय दिनकर अनर्थे, संकेत दादासाहेब वाणी, रोहित सतीश शिरसाठ, संकेत बाळासाहेब पठारे, प्रदीप सोनवणे, प्रियंका शिंदे, वैष्णवी बेलकर या विद्यार्थी नियोजन समितीने परिश्रम घेतले. सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रा.डॉ. नवनाथ शिंदे, प्रा.डॉ.एकनाथ निर्मळ या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
Post a Comment