कोल्हार वार्ताहर - (पत्रकार प्रमोद कुंभकर्ण)
"स्वराज्य रक्षक संभाजी "या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारून रसिक प्रेक्षकाच्या गळ्यातील ताईत बनलेले अभिनेते शंतनू मोघे गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी अकोले येथील अभिनव महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती अभिनव महाविद्यालयाचे डॉक्टर अनिल बेंद्रे यांनी दिली. अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय मधुकरराव नवले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार असून कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रवरा प्रेस क्लबचे उपाध्यक्ष प्रमोद कुंभकर्ण हे आहेत. अभिनव महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी पाच वाजता संपन्न होणार्या या कार्यक्रमात विविध विषयात व कलागुणात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सुप्रसिद्ध अभिनेता शंतनु मोघे यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. शंतनु मोघे हे चित्रपट अभिनेते श्रीकांत मोघे यांचे चिरंजीव असून गीतकार व संगीतकार सुधीर मोघे यांचे पुतणे आहेत अभिनेते शंतनू मोघे यांनी अनेक चित्रपट टीव्ही मालिका व नाटकातून विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत सध्या टीव्हीवरील "आई कोठे काय करते "ही त्यांची टीव्ही मालिकादेखील खूप लोकप्रिय झाली आहे. रंगभूमीवर नव्यानेच आलेल्या "सफरचंद "या नाटकातही त्यांनी भूमिका केली आहे 26 जानेवारी रोजी 25 वा प्रयोग दादर येथे संपन्न झाला.
Post a Comment