प्रवरानगर येथील कारखाना वसाहतीत दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांचा लोणी पोलीस प्रवरा कारखान्याचे सुरक्षा अधिकारी व कारखाना कर्मचारी यांच्या यांच्या सतर्कतेमुळे दरोड्याचा प्रयत्न फसल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. प्रवरानगर येथील ऊस संशोधन शास्त्रज्ञ डॉक्टर योगेश थोरात हे आपल्या कुटुंबीयासहित प्रवरा कारखान्याच्या वसाहतीत राहतात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी पाच ते सहा सशस्त्र दरोडेखोर त्यांच्या निवासस्थानाजवळ आले व त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडत असताना डॉक्टर योगेश थोरात व त्यांच्या पत्नी सौ. सायली थोरात यांनाआवाजाची चाहूल लागली डॉक्टर थोरात यांनी तातडीने कारखान्याचे सुरक्षा अधिकारी नंदकुमार डेंगळे व लोणी पोलीस स्टेशनला भ्रमणध्वनी वरून संपर्क केला रात्री गस्त घालित असलेले लोणी पोलीस स्टेशनचे पीएसआय योगेश शिंदे,सुरक्षा अधिकारी नंदकुमार डेंगळे,लेबर कॉन्ट्रॅक्टर संतोष सुधाकर जायभाय,सुरेश बडे,अंकुश जायभाय, दीपक सकुंडे,दादा खाडे,गोल्हार या कर्मचाऱ्यांसह डॉक्टर थोरात यांच्या निवासस्थाना जवळ तातडीने पोहोचले कोणीतरी आल्याची चाहूल लागताच दरोडेखोरांनी तिथून पळ काढत असताना पीएसआय योगेश शिंदे सुरक्षा अधिकारी डेंगळे संतोष जायभाय सुरेश बडे अंकुश जायभाय व त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी दोन दरोडेखोरांना पकडले तर चार जण पळून जाण्यात यशस्वी ठरले पकडून ठेवलेल्या दोन दरोडेखोरांपैकी एकाने संतोष जायभाय यांच्या उजव्या हाताच्या पंजावर चाकूने वार केला यात संतोष जायभाय किरकोळ जखमी झाले सुरक्षा अधिकारी डेंगळे यांनी या दोन दरोडेखोरांना लोणी पोलीस स्टेशनचे पीएसआय योगेश शिंदे यांच्या ताब्यात दिले अमरसिंग थानसिंग मीनावा (वय 25 )व रितू सिंग लालसिंग मीनावा (वय 50 )दोघेही राहणार गुराडिया जिल्हा धार (मध्य प्रदेश ) अशी या दोन दरोडेखोरांची नावे आहेत लोणी पोलीस स्टेशनचे पी आय समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
Post a Comment