कोल्हार (वार्ताहर ) : साईप्रसाद कुंभकर्ण
कोल्हार येथील राजुरी रोडवरील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बाल विकास केंद्रात सुरू असलेल्या अखंड नाम यज्ञ सप्ताहाची सत्यदत्त पूजन व महाआरतीने व महाप्रसाद वाटपाने भक्तिमय व उत्साहाच्या वातावरणात सांगता झाली या सप्ताह कालात केंद्रात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले सप्ताहामध्ये सहभागी महिलांची संख्या लक्षणीय होती यावेळी रावसाहेब शेजुळ विजय कडू सुदर्शन तरकसे विजय डेंगळे पत्रकार प्रमोद कुंभकर्ण यांनी मनोगत व्यक्त केले तर मंदा वैष्णव उषा चित्ते प्रमोद चित्ते यांनी स्वामी सेवेत आल्यानंतर आलेल्या अनुभवाचे कथन केले 27 डिसेंबर रोजी दुर्गापूर येथे गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या भव्य शेतकरी सत्संग मेळाव्यास मोठ्या संख्येने सेवेकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन सुदर्शन तरकसे यांनी केले. सप्ताह सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वश्री सुधीर खर्डे प्राध्यापक नवनाथ शिंदे अनिल चंद्रभान खर्डे, गोपाळ राऊत,ओम राऊत, राजू भणगे अरुण काळे सुनिता भनगे ज्योती ताडपत्रीकर चैताली खर्डे कविता राऊत अश्विनी खर्डे रूपाली खर्डे शोभा काळे आदी सह कोल्हार केंद्रातील सर्व सेवेकरांनी विशेष परिश्रम घेतले
Post a Comment