कोल्हार : साईप्रसाद कुंभकर्ण 
 आर्थिक व्यवहारा बरोबरच सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट संस्थेच्या कोल्हार शाखेत नागेबाबा विचारधन या दिनदर्शिका प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला यावेळी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे संचालक स्वप्निल निबे प्रवरा सहकारी बँकेचे संचालक आबा राऊत उद्योजक नितीन कुंकूलोळ विजयकुमार गांधी पत्रकार प्रमोद कुंभकर्ण भाऊसाहेब भुजबळ जानकू वडीतके आनंद लोंढे शाखा अधिकारी प्रशांत रासकर,नंदा चिंधे, महेश मोहिते,शुभम साबळे कैलास चोखर आदी उपस्थित होते यावेळी शाखा अधिकारी रासकर म्हणाले संस्थेचे संस्थापक कडू भाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज नागेबाबा मल्टीस्टेटच्या 57 शाखा कार्यरत असून 365 दिवस सुट्टी न घेता सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत संस्थेचे कर्मचारी ग्राहकांना सेवा देत असतात असे सांगून दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल मान्यवरांचे त्यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post