कोल्हार : साईप्रसाद कुंभकर्ण
कौशल्यावर आधारित वास्तवादी, आणि विद्यार्थ्याच्या आवडीची शिक्षण पध्दत नव्या शैक्षणिक धोरणात समाविष्ट असल्याने राष्ट्र निर्मीतीसाठी त्याचा निश्चित उपयोग होईल असा विश्वास शिक्षण धोरण सुकाणू समितीचे राज्य अध्यक्ष माजी कुलगुरू डॉ. नितीन करमरकर यांनी व्यक्त केला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पद्मश्री डॉ. विखे पाटील महाविद्यालय, यांच्यायवतीने आयोजित नवीन शैक्षणिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अमंलबजावणी 2020 विषयी आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप डॉ. करमरकर यांच्या उपस्थित झाला. यावेळी विद्यापीठाचे क्रिडा संचालक डॉ. दिपक माने, आग्रा येथील अरुण शिकांवर, विजय खरे, संस्थेचे सहसचिव भारत, घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डॉ.प्रदिप दिघे, उपप्राचार्य डॉ.आर.जी रसाळ, डॉ.रणपिसे ,डॉ.अनिल वाबळे ,गलांडे मॅडम ,डॉ. महेश खर्डे , कार्यशाळेचे समन्वयक अनिल कु-हे आदीसह संस्थेतील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य आणि विभाग प्रमुख उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात डॉ नितीन करमरकर म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणातून देशाची वाटचाल ही आत्मनिर्भर भारताकडे सुरू आहे. जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात या धोरणाचा विचार करून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्याला हवे ते आणि आपले आवडीचे शिक्षण देत असतानाच कौशल्यपूर्ण आणि रोजगारास चालना देण्याचा प्रयत्न होणार आहे. पारंपारिक शिक्षणापेक्षा संस्कृती, अर्थिक , मुल्यशिक्षण यावर भर देऊन औद्योगिक क्षेत्राला लागणारे कुशल कामगारांसोबतचं शिक्षणातून व्यापक राष्ट्र निर्मीतीला चालना मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षकांनी या धोरणामुळे क्रियाशिलता वाढणार असल्याचे नमूद करून एकमेका मध्ये सहकार्य आणि विचाराची देवाण - घेवाण होणार आहे. यामुळे न घाबरता संशोधन करा नवीन कल्पना मांडा आणि पुढे जा असाही सल्ला त्यांनी दिला.
प्रारंभी प्राचार्य डॉ. प्रदिप दिघे यांनी कार्यशाळेचा उद्देश सांगुन विषद केला कार्यक्रमाचे सुञसंचालन डॉ. वैशाली मुरादे आणि प्रा.हर्षदा खर्डे यांनी तर आभार डॉ अनिल कु-हे यांनी मानले.
Post a Comment