कोल्हार प्रतिनिधी : साईप्रसाद कुंभकर्ण 

पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील अग्निवीर योजनेअंतर्गत एन.सी.सी.च्या चार छात्रांची भारतीय सैन्यात निवड झाली. कॅडेट आकाश विजय तांबे व कल्पेश भाऊसाहेब जाधव यांची आर्टिल्लरी ट्रेनिंग सेंटर, नाशिक येथे, कॅडेट आशीष बाळासाहेब कदम यांची हेडक्वार्टर 1 सिग्नल ट्रेनिंग सेंटर, जबलपुर येथे तर कॅडेट कृष्णा संजय जपे यांची आर्टिल्लरी ट्रेनिंग सेंटर, हैद्राबाद येथे निवड झाली त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. दिघे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयातील एन.सी.सी. ऑफिसर कॅप्टन सुजाता देवरे, कॅप्टन डॉ. राजेंद्र पवार, केअर टेकर ऑफिसर प्रा. दशरथ खेमणर व शारीरिक संचालक डॉ. उत्तम अनाप यांचे त्यांना सैन्यात भरतीसाठी बहुमोल मार्गदर्शन लाभले. लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील, (महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महाराष्ट्र राज्य) मा. खासदार डॉ. सुजायदादा विखे पाटील, मा. सौ. शालिनीताई विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त सचिव मा. भारत पाटील घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.दिघे यांनी भारतीय सैन्यदलात निवड झालेल्या कॅडेटला शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post