पंचक्रोशीतील जुन्या पिढीतील आदर्श शिक्षक, अनेकांना दिशा आणि मार्ग दाखवणारे दीपस्तंभ कै. जगन्नाथ गुरुजी यांचे आत्मचरित्र "माझा कर्मयोग" या आत्मकथनाचे प्रका शन किर्तन केसरी ह.भ.प.नरेन्द्र महाराज गुरव यांच्या शुभ हस्ते व साहित्यिक कवी यशवंत पुलाटे यांचे प्रमुख उपस्थितीत झाले.या प्रसगी कवी यशवंत पुलाटे बोलत होते. यावेळी बोलताना ह.भ. प. नरेंद्र महाराज गुरव म्हणाले की पर्वत गुरुजींनी समाजात आदर्श पिढी व आदर्श समाज निर्माण केला शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी फार मोठे योगदान दिले, त्यांच्या ज्ञानामुळे अनेक विद्यार्थ्यांना जगण्याचा व जीवनाचा मार्ग सापडला.
याप्रसंगी डॉ. प्रा भागसेन पर्वत, संदीप घोलप, सुभाष शिरसाट ,वंदना घोलप, सुनंदा शिरसाट, संगीता पर्वत, सुनिता पर्वत , विलास शिंदे, सुभाष शिंदे, किरण अंत्रे,अनिल अनाप,सूर्यभान शिंदे आदी उपस्थित होते.
Post a Comment