कोल्हार वार्ताहर (प्रमोद कुंभकर्ण)-
 वाहतूक करणाऱ्या वाहनांना दिसतील अशा पद्धतीने रिप्लेटर लावावे वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून अपघात टाळावे असे प्रतिपादन मोटर वाहन निरीक्षक योगेश मोरे यांनी केले प्रवरानगर येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याच्या केनयार्डात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मोरेबोलत होते यावेळी विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू पाटील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गणेश राठोड सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक एस.के.निकुंभ प्र.कार्यकारी संचालक अशोक भागडे,लेबर ऑफिसर किशोर निघुते , शेतकरी अधिकारी जी. एन.चेचरे कारखान्याचे सुरक्षा अधिकारी नंदकुमार डेंगळे,सेफ्टी अधिकारी सुखलाल खर्डे,केनयार्ड सुप्रीडेंट भागवत खर्डे, नामदेव वहाडणे, दिनकर गोडगे, कारखान्याचे सुरक्षा कर्मचारी सोन्याबापु दातीर सतीश आहेर, आबासाहेब म्हसे , प्रशांत आहेर, नाना जाधव,यांचे सह वाहन चालक व मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी यार्डातील ट्रक ट्रॅक्टर बैलगाडी या वाहनांना रेडियम स्टिकर लावण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारखान्याचे सुरक्षा अधिकारी नंदकुमार डेंगळे यांनी केले आभार प्रदर्शन पत्रकार प्रमोद कुंभकर्ण यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post