कोल्हार ( वार्ताहर ) :- साईप्रसाद कुंभकर्ण
यज्ञ केल्याने जीवनातील समस्या दूर होतात.संकल्प सिद्धीला जातात परमात्म्याच्या चरणी समर्पित झाल्यावर परमात्मा आपल्या मनाचे संकल्प सिद्धीला नेतो .असे प्रतिपादन श्री क्षेत्र सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले. योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांचा 120 वी पुण्यतिथी सोहळा व मंदिर जिर्णोद्धार व विविध देवता प्राणप्रतिष्ठा निमित्त हरिहर महायज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 16 ते 23 डिसेंबर 2022 रोजी श्री क्षेत्र सरला बेटावर संपन्न होत आहे या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हार भगवतीपूर येथील ग्रामदैवत भगवती माता मंदिरात आयोजित बैठक प्रसंगी महंत रामगिरी बोलत होते यावेळी कोल्हार भगवतीपुर देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष सयाजी रघुनाथ खर्डे ,विश्वस्त श्रीकांत खर्डे ,विखे कारखान्याचे माजी संचालक विजय खर्डे, मधु महाराज, शाम गोसावी, पत्रकार प्रमोद कुंभकर्ण पत्रकार प्रा.साईप्रसाद कुंभकर्ण ,गोरक्ष राऊत, सुरेश राका, भगवतीपुरचे माजी सरपंच रावसाहेब खर्डे पाटील व देवालय ट्रस्टचे कर्मचारी रमेश खर्डे ,प्रवीण बेंद्रे ,साहेबराव गाडे,रविराज राजभोज,मधुकर राजभोज, सुरज खंदारे,नामदेव घोगरे, युवराज घोगरे सुभाष वाघ आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी महंत रामगिरी यांनी महायज्ञ सोहळ्या बाबत विस्तृत माहिती देऊन महायज्ञ कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे भाविक भक्तांना आवाहन केले . देवालय ट्रस्टच्या वतीने महंत रामगिरी व मधु महाराज यांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मधु महाराज यांनी केले.
Post a Comment