कोल्हार (वार्ताहार) : साईप्रसाद कुंभकर्ण
 राहता तालुक्यातील तिसगाव वाडी येथील मोठेबाबा देवस्थानाच्या यात्रा उत्सवास आज पासून प्रारंभ होत असल्याची माहिती देवस्थानचे पुजारी सुनील कालेकर यांनी दिली सोमवार दिनांक 7 व मंगळवार दिनांक 8 रोजी असे दोन दिवस हा यात्रा उत्सव संपन्न होणार असून यात्रा उत्सवानिमित्त सकाळी श्रीच्या मूर्तीस महाअभिषेक पूजा आरती सायंकाळी सात वाजता अग्निहोम कार्यक्रम रात्री आठ वाजता गणेश नगर येथील भागिनाथ राहींज( वाघे ) यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.मंगळवारी दुपारी कुस्ती हंगामा व इतर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होतील. भक्तांच्या नवसाला पावणारे मोठे बाबा देवस्थानाचा यात्रा उत्सव कोविडच्या निर्बंधामुळे दोन वर्ष अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला.परंतु यावर्षी हा यात्रा उत्सव निर्बंध मुक्त साजरा होत आहे. त्यामुळे भाविक भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे यात्रा उत्सवानिमित्त मंदिराच्या कळसावर व मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे .भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने यात्रा उत्सवात सहभागी होऊन मोठेबाबा देवस्थानचा दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा उत्सव समिती व तिसगाव वाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post